चोपडा शहर पोलीसाकडुन गांजा वाहतुक करणा-या दोन टोळ्यांवर धडाकेबाज कारवाई

चोपडा प्रतिनिधी विनायक पाटील
चोपडा तालुक्यात दिनांक 15/01/2025 व 16/01/2025 च्या रात्री चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन दोन ठिकाणी पोलीसांनी छापा टाकुन मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे.
पहिल्या कारवाई मध्ये चोपडा शहर पोलीस ठाणे यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाई करुन अकुलखेडा ता चोपडा येथे दोन मोटार सायकल स्वारांना पकडुन त्यांचेकडुन चार किलो सातशे ग्रॅम गांजा हस्तगत केला असुन त्यांचे विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गु र नं 10/2025 एनडीपीएस अॅक्टचे कलम 8 (क), 20(ब) 1) (2) (2) (ब), (ब), 22 (बी) प्रमाणे गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे हे करत आहेत.
त्याचप्रमाणे पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गांजा वाहतुक चालु असल्याची माहिती मिळाल्यावरुन दुस-या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, सफौ जितेंद्र सोनवणे, पोहेकॉ हेमंत कोळी, पोहेकॉ महेंद्र साळुंखे, पोकॉ महेंद्र पाटील, पोकों रविंद्र मेढे, पोकॉ प्रकाश मधुरे, पोकॉ प्रमोद पवार, पोकॉ समा तडवी, पोकॉ अक्षय सुर्यवंशी, पोकॉ शाम धनगर, पोकॉ पंकज ठाकुर, पोकों जगन्नाथ पाटील, पोकॉ राजेंद्र कोळी, पोकॉ रजनीकांम भास्कर अशांनी विविध पथके तयार करुन शिरपुर ते चोपडा रोडवर सापळा लावला असता एक इको कार क्रमांक एम एच 06-बी यु-5138 मधुन भरधाव वेगाने गांजा वाहतुक करणा-या पाच जणांच्या टोळीला शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडील गाडीमधे दोन गोण्यांमध्ये भरलेले 31 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. सदर पाच इसमांविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गु र नं 11/2025 एनडीपीएस अॅक्टचे कलम 8 (क), 20(ब) (2) (क), 22 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करुन पाच आरोपीतांस अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेड्डी सर, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग अण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
