ताज्या बातम्या

चोपड्यातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा : येथील चोपडे एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात दिनांक 14 रोजी दुपारी 02.00 वाजता माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला. सदर मेळावा महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रोफे. डॉ .जयेश गुजराथी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मार्गदर्शक डॉ. जयेश गुजराथी मार्गदर्शन करताना म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांना नॅक ची संकल्पना समजून सांगितली. नॅक हे महाविद्यालयाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी असले तरी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी अधिक फायदेशीर आहे. विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक हेदेखील महाविद्यालयाच्या गुणवत्तेत मोलाची भूमिका बजावतात हे लक्षात आणून दिले. म्हणून महाविद्यालयातून शिक्षण घेऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा गुणवत्ता वाढवण्यासाठी महाविद्यालयात सहभाग नोंदवावा. नेहमी मार्गदर्शन करावे अन् सल्ला द्यावा असे आवाहन करण्यात केले. माजी विद्यार्थ्यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. उस्फूर्तपणे सहकार्य करून महाविद्यालयाचा गुणवत्तेचा आलेख कसा वाढेल यासाठी सदैव प्रयत्न करत राहू असे माजी विद्यार्थी मेळाव्याचे अध्यक्ष तुषार लोहार यांनी सांगितले. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातील जुन्या आठवणी आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.यावेळी चोपडे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव माधुरी मयूर,आय. क्यू. ए.सी. कमिटीचे सदस्य गोविंद गुजराथी, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तुषार लोहार, उपाध्यक्ष प्रफुल्ल जोशी, खजिनदार रुपेश नेवे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रजनी सोनवणे, माजी प्राचार्य श्री एम. पी. पाटील, समन्वयक प्रा.श्री एन. डी. वाल्हे,प्रा.डॉ. सविता जाधव, माजी विद्यार्थी संघटनेचे विविध ठिकाणावरून आलेले विद्यार्थी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ. सविता जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *