चोपड्यात पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या वतीने प्लॉट धारकांसाठी लकी ड्रॉ सोडत…

इलेक्ट्रिक बाइक सह अनेक बक्षिसांचे वाटप*
प्रतिनिधी-विनायक पाटील
चोपडा – पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या वतीने गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर भव्य प्लॉट बुकिंग मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात प्लॉट बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ सोडत काढण्यात येणार होती. ठरल्यानुसार दि.२२ ऑक्टोबर रोजी सदर लकी ड्रॉ सोडत पंकज एम्पायर या ठिकाणी काढण्यात आली . सदर लकी ड्रॉ सोडत मध्ये नंदलाल बाबुलाल अग्रवाल , पुनम नैनेश अग्रवाल , नयना शिवलाल जैस्वाल , निंबा शंकर अत्तरदे , सुनील प्रताप पाटील , राहुल अशोक पाटील , मालती निंबा अत्तरदे, अनिल प्रताप पाटील , इत्यादी प्लॉट धारकांचा लकी ड्रॉ सोडत मध्ये समावेश होता. सदर लकी ड्रॉ सोडत मधील प्लॉट धारकांच्या नावांची चिठ्ठी एका बरणीत टाकून इयत्ता दुसरीचा विद्यार्थी मोक्ष दिलीप जैस्वाल याच्या हस्ते लकी ड्रा सोडत धारकांची चिठ्ठी काढण्यात आली. त्यात पहिले लकी ड्रॉ विजेते अनिल प्रताप पाटील हे ठरले त्यांना इलेक्ट्रिक बाइक देण्यात आली. दुसरे बक्षीस दीड टन एसी चे विजेते मालती निंबा अत्तरदे या ठरल्या . नंदलाल बाबुलाल अग्रवाल यांना अनुक्रमे तिसरे व पाचवे बक्षीस मिळाले त्यात ४३ इंच एलईडी टीव्ही व २०० लिटर क्षमतेचा एलजी फ्रीज व चौथे क्रमांकाचे बक्षीसाचे विजेते राहुल अशोक पाटील हे ठरले त्यांना ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन देण्यात आले .
पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चोपडाचे संचालक पंकज बोरोले आपल्या मनोगतात म्हणाले की, गेल्या ३२ वर्षापासून पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ने आपल्या प्रगतीचा व विश्वासाचा आलेख सतत उंचावत ठेवला आहे आतापर्यंत ६५ अधिक नगर / कॉलनी डेव्हलप केल्या आहेत. सर्वच प्लॉट धारक हे समाधानी व संतुष्ट असल्याचे ते म्हणाले . गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावरील प्लॉट बुकिंग मेळाव्यास भरघोस प्रतिसाद मिळाला होता .पुन्हा ग्राहकांच्या आग्रहास्तव नवरात्र उत्सव व दसरा निमित्त पंकज एम्पायर येथे एन ए प्लॉट्सचा भव्य बुकिंग मेळावा दि. २१ ते २४ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. त्यात लकी ड्रॉ चे प्रथम बक्षीस ६०००० रुपये ( साठ हजार रुपये ) किमतीचे ब्रँडेड लॅपटॉप व दुसरे बक्षीस ३०००० रुपये ,( तीस हजार रुपये ) किमतीचा ब्रँडेड मोबाईल मिळणार आहे. या व्यतिरिक्त ३० दिवसांच्या आत प्लॉट खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकास सॅमसंग टॅब भेट देण्यात येणार आहे .
सदर बुकिंग मेळावा यशस्वीतेसाठी रविंद्र अग्रवाल , गणेश चव्हाण , अक्षय पाटील , सिताराम चोपडे , शुभम पाटील आदींनी परिश्रम घेतले.
