चोपड्यात मंत्री गुलाबराव पाटील यांना सकल मराठा समाजाने दिले आरक्षण मागणीचे निवेदन
प्रतिनिधी-विनायक पाटील…
चोपडा – राज्यातील मराठा समाजातील बांधवांना कायद्याने सारे पुरावे असताना देखील आरक्षण देण्यात सरकार चालधकल करीत असल्याची साऱ्या समाजाची भावना असून.मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे संपूर्ण समाज उभा असून त्यांच्या जीवाची काळजी करून, मा गुलाब भाऊ यांनी मुख्यमंत्र्यांशी असलेले त्यांचे संबंधांचा वापर करून लवकर आरक्षण मिळावे यासाठी आज चोपडा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने कार्यक्रमासाठी आलेल्या पालकमंत्री मा गुलाबराव पाटील यांना भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी भटू पाटील,विश्वासराव बोरसे, भरत पवार, डॉ रवींद्र निकम,भय्यासाहेब बाविस्कर, नरेंद्र बाविस्कर,एस बी पाटील,दिनेश बाविस्कर,प्रमोद बोरसे,डॉ रवींद्र पाटील,एस एम पाटील, प्रभाकर बोरसे,अजित पाटील,रमाकांत सोनवणे,दीपक पाटील,कैलास पाटील, ॲड कुलदीप पाटील,भय्या पवार,गोकुळ पाटील,शशिकांत पाटील,वसंत पाटील,भालेराव सोनवणे,राजन पवार,तुषार सूर्यवंशी,विनोद पाटील,अरुण नेरपगारे,विजय देशमुख,रामचंद्र देशमुख,माधवराव सोनवणे,धीरज महाजन,दिनेश पाटील,देवेंद्र पाटील,तेजस कदम,शशिकांत पाटील यांचेसह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.