ताज्या बातम्या

चोपड्यात महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न

चोपडा प्रतिनिधी : विनायक पाटील

महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा दरवर्षी इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी, इयत्ता चौथी, इयत्ता सहावी व इयत्ता सातवी वर्गासाठी आयोजित केली जाते. सदर परीक्षा मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी तिन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी आयोजित केली जाते. सदर परिक्षा बालमोहन विद्यालयात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. इयत्ता दूसरी ते सातवीच्या एकूण ११५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सदर परीक्षेच्या बैठकीचे नियोजन एकूण ३९ ब्लॉक मध्ये करण्यात आले होते.

केंद्र संचालक म्हणून जळगाव येथील एस के पाटील यांनी काम पाहिले तर तालुका समन्वयक म्हणून पंकज प्राथमिक विद्यालयाचे आर डी पाटील यांनी काम पाहिले. त्यांना बाळासाहेब पाटील, उदय पाटील, चैतन्य पाटील, सचिन जैस्वाल, तुषार सूर्यवंशी, ललित सुतार यांचे सहकार्य लाभले.

परीक्षेचे पर्यवेक्षण माधुरी पाटील, पुनम देवकर, अश्विनी मोरे, मीनाक्षी दुसाने, कोमल कुंभार ,जिज्ञासा चौधरी ,राणी वाघ, हर्षाली राठोड, रोशनी बारेला, कृष्णा भिल्ल ,अश्विनी वाघ, कबाबाई बारेला ,प्राजक्ता सोमवंशी, किरण बारेला, सरिता कोळी, शितल बारेला, नेरूबाई बारेला, मेघा ताडे, तृप्ती महाजन ,सविता बारेला, पायल बडगुजर, पायल पावरा ,पूजा बाविस्कर, राजश्री धनगर, वैष्णवी मराठे, वैष्णवी पाटील, पूजा सुलताने, रितू समाधान ,रोशनी जाऊळे , रोशनी गवळी, नंदिनी सपकाळे, नंदनी वारडे,दीक्षा राजकुळे, हेमराज पावरा, चेतन वाघ, निशा जाधव, सुवर्णा नाथबुवा, भाग्यश्री बडगुजर आदींनी पर्यवेक्षण केले. तर ऑब्झर्वर म्हणून अध्यापक विद्यालय चोपडाचे एस एस देशमुख सर यांनी काम पाहिले. परीक्षेसाठी इमारत संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा पाटील , विजय दिक्षित, राकेश पाटील, मुख्याध्यापक प्रदिप चौधरी यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल एम टी एस परीक्षा आयोजकांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *