ताज्या बातम्या

चोपड्यात २ गावठी बनावटी कट्टे पिस्टल व ४ जिवंत काडतुस आरोपी जेरबंद..

प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा : ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गुप्त बातमी मिळाली की, दिनांक १७/०६/२०२४ रोजी २०/३० वाजेचे सुमारास वैजापुर ते बोरअंजटी रोडवर तेल्या घाटात दोन इसम हे घेवुन जात आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी पोना शशिकांत पारधी, पोकॉ दिपक शिंदे, पोकॉ चेतन महाजन, पोकॉ अभिषेक सोनवणे, आदींना माहिती देवून सदर इसमावर कारवाई करणे बाबत आदेश केले होते. तेव्हा पोना शशिकांत पारधी, पोकॉ दिपक शिंदे, पोकॉ चेतन महाजन, पोकॉ अभिषेक सोनवणे, अशांनी वैजापुर ते बोरअंजटी रोडवर तेल्या घाटात सापळा रचुन सदर इसम हे त्याचे ताब्यातील मोटर सायकल क्रमांक शाईन कंपनीची मोटार सायकल तीचा आर टी ओ पासींग क्रमांक एम एच १६ सी एक्स ९६६४ हिच्यावर आल्याने त्यांना सदर ठिकाणी थांबवुन त्याचे नाव गाव विचारता त्यानी त्याचे नाव १) तुषार हनुमंत पवार वय २० वर्षे, सदर आरोपी यांच्यावर अहमदनगर जिल्हात ७ गुन्हे दाखल असुन त्याच्या अहमदनगर जिल्हातुन तडीपाड पसताव पाठवण्यात आला आहे २) भरत सुखदेव जायगुळे वय २२ वर्षे, यांच्या वर अहमदनगर जिल्हात २ गुन्हे दाखल आहेत दोन्ही रा. जामवाडी, ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर, असे सांगुन त्याचे ताब्यात ०२ गावटी बनावटी कट्टे (पिस्टल) व ०४ जिवंत काडतुस व एक मोटर सायकल, दोन मोबाईल, व ३००/- रुपये रोख असे एकुण १०४,३००/- रूपये किमतीचा म द्देमाल मिळुन आला आहे. सदर आरोपी विरुध्द पोकॉ रावसाहेब पाटील यांनी फिर्याद दिले त्या वरुन गुन्हाहा चोपडा ग्रामिण सी सी टी एन एस गु र नं ९८/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५,७/२५ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयांचा तपास सपोनि शेषराव नितनवरे व पोकॉ किरण पारधी हे करीत आहेतसदरची कारवाई ही अप्पर पोलीस अधिक्षक सो चाळीसगाव परिमंडळ, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा याचे मार्गदर्शनाखाली पोनि कावेरी कमलाकर व पोना शशिकांत पारधी, पोकॉ दिपक शिंदे, पोकॉ चेतन महाजन, पोकॉ अभिषेक सोनवणे अशांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *