छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पाचोड येथील प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे यांची जिल्हा करियर कट्टा प्राचार्य प्रवर्तक म्हणून नियुक्ती

पाचोड : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पाचोड येथील शिवछत्रपती कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा करियर कट्टा प्राचार्य प्रवर्तक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात सुरू असणारा करिअर कट्टा या उपक्रमामध्ये आपल्या विभागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा व या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक विविध उपक्रम राबविणे सुलभ व्हावे या उद्देशाने जिल्हा निहाय अनुभवी व कर्तव्य संपन्न प्राचार्य व्यक्तींची निवड केली जाते त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी पाचोड येथील शिवछत्रपती कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा करिअर कट्टा प्राचार्य प्रवर्तक म्हणून २०२५ ते २०३० या पाच वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे यांची जिल्हा करिअर कट्टा प्राचार्य प्रवर्तक म्हणून पाच वर्षासाठी नियुक्ती झाल्याबद्दल उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर, विभागीय संचालक डॉक्टर रणजितसिंह निंबाळकर, विभागीय प्रवर्तक प्राचार्य डॉक्टर भारत खंदारे , प्राचार्य डॉक्टर अशोक तेजनकर , डॉक्टर राजेंद्र उढान , डॉक्टर राजेश लहाने , संभाजीनगर जिल्हा समन्वयक डॉ लक्ष्मीनारायण कुरपटवार , डॉक्टर वैशाली पेरके , डॉक्टर तुकाराम गावंडे , डॉक्टर गांधी बानायत , आदींनी कौतुक केले आहे.