छावा चित्रपट प्रत्येक शाळा व महाविद्यालय मध्ये मोफत दाखविण्याची दिपेश पाटील यांची मागणी

चोपडा प्रतिनिधि / विनायक पाटील
‘छावा’ चित्रपट प्रत्येक शाळा व महाविद्यालयत मोफत दाखविण्याची मागणी चोपड्याचे शिवसेनेचे आरोग्य दूत दिपेश समाधान पाटील, घाडवेलकर यांनी केली मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे.
त्यांनी आपल्या पत्रात म्हटल्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर आधारित छावा चित्रपट प्रत्येक शाळा व महाविद्यालय मध्ये दाखवण्यात यावा. जेणे करून महाराष्ट्रातील तरुण तरुणींनी युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे विचार तसेच त्यांचा इतिहासाची जाणीव होणे काळाची गरज आहे. आपण बघत असाल की अनेक वेळा आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र एकी कडे म्हणून घेत असताना मात्र महिला अत्याचार देखील वाढत चाललेले आहेत. असा विषय लक्षात घेता छावा चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा व महाविद्यालय मध्ये दाखवण्यात यावा.
शाळा व महाविद्यालयात चित्रपट दाखवण्या मागील कारणे –
१) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास प्रत्येक युवा पिढीला कळेल.
२) शाळेत व महाविद्यालात दाखवण्यात आल्यास मुला मुलीच्या मधे एक प्रेरणा निर्माण होईल.
३) युवा पिढीत ह्या चित्रपट पहिल्या नंतर भविष्याची वाट कितीही खडतर असून देखील महाराज ज्या प्रमाणे लडले त्या प्रमाणे युवा पिढी मध्ये लढण्याची जिद्द निर्माण होईल.
४) महाराष्ट्रात तरुण पिढी ही त्यांचा स्वप्नांचा मागे धावत धावत एवढ्या टेन्शन / डिप्रेशन मधे असते की ते कधी स्वतः खचून जाऊन टोकाची भूमिका घेतात.
.. जे आज डिजिटल युगात देखील ज्यांचा कडे आज सुद्धा दारिद्र्य रेषेत आहेत. सोबतच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे जे पैशांचा अभावामुळे मोठ मोठ्या चित्रपट गृहात जाऊ शकत नाही त्यांना पुस्तकाचा इतिहासच कळतो. त्यांना हा चित्रपट दाखवणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. हा चित्रपट दाखवल्या वर नक्कीच त्यांचा विचारसरणीत फरक पडल्याशिवाय राहणार नाही. एवढच नाही तर महाराजांनी ज्या प्रकारे संघर्ष केला. त्याचबरोबर सर्व संपून गेले आहे असे वाटत असताना मागचा पुढचा विचार न करता त्या ठिकाणी पुन्हा त्याच जिद्दीने आणि चिकाटीने महाराजांनी लढाई सुरू ठेवली असे अनेक विषय आहेत. ज्या मुळे तरुण तरुणींनी मध्ये महाराजांचा इतिहास पोहचण्यास मदत होईल.
म्हणून आपल्याला विनंती असेल की शक्य होत असेल तर आपण शाळा आणि महाविद्यालय मध्ये छावा चित्रपट हा मोफत दाखवण्यात यावा. अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.