ताज्या बातम्या

जमिनीच्या व्यवहारातील फसवणुकीच्या आरोपातून चौघांची निर्दोष मुक्तता ; धरणगांव न्यायालयाचा निर्णय

धरणगांव – धरणगांव पोलिस स्थानकात धरणगांव येथील चार जणांवर जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून फसवणुकीचा गुन्हा २०१८ साली दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपसाअंती धरणगांव न्यायालयाने चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे.

धरणगांव येथील सौ. आनिता सुनिल चौधरी रा.चिंतामणी मोरया धरणगांव ता. धरणगांव यांनी फिर्याद दिल्यानुसार डॉ. हेडगेवार नगर येथील मयूर भालचंद्र बागूल व प्रतिभा भालचंद्र बागूल यांच्या मालकीचे गट क्र. ५३८ / १ / १ या क्षेत्रावर दिनांक २३/१२/२०१५ रोजी अनिता चौधरी यांचे पती सुनील मधुकर चौधरी यांचे ओळखीचे विजय छंदलाल गाडोलोहार रा. लहान माळीवाडा, धरणगांव हल्ली मुक्काम कल्याण यांनी मयुर भालचंद्र बागुल व त्यांची आई श्रीमती प्रतिभा भालचंद्र बागुल रा.सत्यनारायण चौक धरणगांव ता.धरणगांव यांच्याकडुन धरणगांव येथील पूर्वीचे नगरपालीका हद्दी बाहेरील व सध्याचे डॉ. हेडगेवार नगर हद्दीतील शेत गट क्र. ५३८/१/१ यांचे क्षेत्र १ हेक्टर १२ आर याचे खरेदीखत करुन देणे कामी सौदापावती कलेली होती. सदर पावती प्रमाणे या शेतीवर प्लॉट पाडुन आम्ही विक्री करणार आहोत त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी आम्ही जे प्लॉट पाडु त्यातील काही प्लॉट खरेदी करावे असे सांगुन दिनांक ११/०१/२०१७ रोजी आम्हाला विजय छंदलाल गाडीलोहार यांनी करारनामा करुन आमच्याकडून रुपये ७० हजार रोख तसेच ४ लाख ३० हजार रुपयाचा एच.डी. एफ. सी. बँक शाखा जळगांव अशी रक्कम विजय लोहार यांनी स्वीकारली. मात्र विजय लोहार यांनी सदर प्लॉट खरेदी करून दिले नाहीत. म्हणुन माझी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने 1) विजय छंदलाल गाडीलोहार, 2) मयुर भालचंद्र बागुल 3) श्रीमती प्रतिभा भलचंद्र बागुल तसेच परस्पर सदर व्यवहार माहिती असतांनाही प्लॉट खरेदी करणारे 4) दिपक रामकृष्ण गांगुर्डे रा.जळगांव यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०६, ३४ अन्वे धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हाचा तपास धरणगाव पोलिसांनी करून धरणगांव न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. यात फिर्यादी अनीता सुनील चौधरी यांनी यापुढे सदर सुनावणी पुढे चालविण्यास नकार दिल्याने धरणगांव न्यायालयाचे न्यायाधीश यांनी वरील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अँड.आर.एस.हटकर मॅडम यांनी तर आरोपींचे वकील म्हणुन अँड.व्ही.एस.भोलाणे यांनी काम पहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *