ताज्या बातम्या

जळगांव – एरंडोल येथील आरोग्य दूत विक्की खोकरे बनून आले देवदूत ; अपघातात गंभीर जखमी व्यक्तीचे वाचले प्राण

एरंडोल : ज्याच्या नशीबाची दोरी बळकट असते, तो मृत्यूच्या दारात जाऊन परत येतो. एरंडोल येथील आरोग्य दूत विक्की खोकरे यांनीही अपघातातील गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे अशाच प्रकारे देवदूत बनत प्राण वाचविले. आरोग्य दूत विक्की खोकरे यांनी तत्परता दाखवून आपली रुग्णवाहिका घेवून घटनास्थळी धावून आले आणि या युवकाला हॉस्पिटलला हलविले असता डॉ. राहुल वाघ यांनी तातडीने उपचार केलेत. एरंडोल येथील काही अंतरावरील हॉटेल प्रियंकाच्या पुढे काल रात्री मोटरसायकलचा अपघात झाला होता. या अपघातात मोटारसायकल चालक गंभीर अवस्थेत पडलेला होता. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी शहरातील आरोग्य दूत विक्की खोकरे यांना मदतीसाठी फोन केला. विक्की खोकरे यांनी लगेच तत्परता दाखवून आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धावून आले. यावेळी युवकाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो बेशुद्ध अवस्थेत होता आणि रक्तस्राव सूरूच होते. खोकरे यांनी तातडीने पद्मालय हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल वाहक यांना फोन करून सांगितले. आणि रुग्णवाहिका हॉस्पिटलला हलविली. यावेळी डॉ. राहुल वाघ यांनी तातडीने उपचार सुरू केले. आणि पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविले असता आता युवकाचा जीव धोक्याबाहेर असून सुखरुप आहे. युवकाला योग्य वेळी योग्य मदत व उपचार मिळाल्याने त्याचे आज प्राण वाचले.विक्की खोकरे अपघात ग्रस्त रुग्णांच्या मदतीला येतात धावूनएरंडोल रस्ता हा नॅशनल हायवे असल्याने रात्री येथे अनेक अपघातांच्या घटना घडतात. यावेळी अनेक नागरिकांसह पोलीस प्रशासन देखील विक्की खोकरे यांना रुग्णवाहिका मदतीसाठी नेहमी फोन करत असतात. अशावेळी विक्की खोकरे हे देखील तातडीने जाऊन अपघातग्रस्त रुग्णांना मदतीला धावत असल्याने अनेकांचे प्राण अशाच पद्धतीने वाचवले म्हणून नेहमी त्यांचे कौतुक होत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *