ताज्या बातम्या

जळगांव : कजगाव येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, शेतकऱ्याच्या आत्महत्येने दिवाळी झाली कडू

प्रतिनिधी : आमीन पिंजारी कजगावं ता.भडगावं

कजगाव ता. भडगाव : येथे अल्पभूधारक कर्जबाजारी शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने कजगाव परीसरात हळहळ व्यक्त होत आहेबस्थानक परिसरातील सावता माळी चौक भागातील शिवाजी नथ्थु महाजन वय ४५ वर्ष असे ह्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव असून त्यांच्याकडे दोन एकर शेती असून त्यांचे व कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता दिवसभर काबाडकष्ट करून ते पूर्णवेळ शेतकरी म्हणून काम करीत होते मात्र अश्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या आत्महत्या ने समाजमन सुन्न झाले आहे दिवाळी होऊन दोन दिवस होत नाही तोच अश्या पद्धतीने शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्याने कजगाव परीसरात शोक व्यक्त होत आहे पावसाने मारलेल्या दांडीने बळीराजा मेटाकुटीला आला आहे शेतातील उत्पन्न सत्तर टक्यांपेक्षा अधिकचे घटल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे शेती उपयोगासाठी खर्च केलेले पैसे देखील शेतातून निघाले नाहीत त्यामुळे घेतलेले कर्ज चा बोजा दिवसेंदिवस वाढत चालल्याने समोरील संकट दिवसेंदिवस गडद होत चालले होते येणारे उत्पन्न पाहुन शेतीवर घेतलेले अनेक प्रकारचे कर्ज फेडण्याची कुठलीस शक्यता समोर दिसत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेऊन स्वतःचे जीवन संपवून घेतले गावातील एक तरुण शेतकऱ्यांचा असा दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे मयत शेतकऱ्यावर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी,आई,दोन मुली,मुलगा, दोन भाऊ,असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *