जळगांव जिल्हा

जळगांव : कोरपावली ग्रामपंचायतीची नविन इमारत उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत

यावल / प्रतिनिधि – अमीर पटेल

जळगांव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील कोरपावली येथील ग्रामपंचायतीचे भूमिपूजन हे दि. ८ फेब्रवारी २०२३ रोजी आमदार लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग अंतर्गत जनसुविधा विकास २२ – २३ कार्यक्रम अंतर्गत जवळपास २२ लक्ष रुपयाचे हे काम पूर्ण झालेले आहे. भूमिपूजन होवून एक वर्ष पूर्ण होण्यात आले असून सध्या स्थितीत बांधकाम पूर्ण झालेले आहे. मात्र सदरच्या इमारतीची ग्राम पंचायत व नगरिक उद्घाटनाची वाट पाहत आहेत.

तरी संबंधित विभागाने इमारतीची काही कामे अपूर्ण असल्यास पूर्ण करावीत व इमारत नागरिकांसाठी खुली करावी अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *