जळगांव-चिंचपूरा येथे मा.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालया तर्फे वह्या वाटप
धरणगाव – तालुक्यातील चिंचपूर येथे गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मा.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय धरणगाव यांच्यातर्फे अशोकभाऊ जैन यांच्या सहकार्याने चिंचपुरा गावातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.
या प्रसंगी मा.भवरलालभाऊ जैन वाचनालयाचे अध्यक्ष धरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले दरवर्षी वाचनालयातर्फे धरणगाव तालुक्यातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येतात अशोकभाऊ जैन यांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात त्यात गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप हा एक उपक्रम दरवर्षी राबवला जातो सदर कार्यक्रमाला चिंचपुरा गावाचे सरपंच कैलास पांडुरंग पाटील,माजी सरपंच गोकुळ पाटील, शिवसेनेचे तालुका संघटक हेमंतभाऊ चौधरी,सहसंघटक संभाजी कंखरे, वाचनालयाचे सचिव योगेशभाऊ पाटील, पितांबर पाटील,संतोष पाटील,मुरलीधर पाटील,कौतिक पाटील,विठ्ठल पाटील, श्रीराम पाटील तसेच गावातील अनेक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.