ताज्या बातम्या

जळगांव-चोपड्यात सह्याद्री श्रमिक असंघटित कामगार संघटनेची स्थापना

प्रतिनिधी- लतीश जैन

चोपडा – शहरात व जळगांव जिल्ह्यात कामगारांसाठी सह्याद्री श्रमिक असंघटित काम गार संघटना स्थापन झालेली असून सदर संघटना ही श्रमिक संघ नोंदणी अधिनियम १९२६ नुसार शासन मान्यता प्राप्त संघटना असून संस्थेचा नोंदणी क्र. एनएसके /जे / २२८८ असा आहे. सदर संघटना ही सर्वसामान्य असंघटित कामगारांना त्यांचा हक्क व व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत राहण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली असून विविध कल्याणकारी योजनांचा प्रसार, प्रचार करणे व राबविणे तसेच असंघटभत कामगारांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक बेरोजगार, स्वयंरोजगाराचा सर्वे करून त्यांना न्याय मिळवून देणे व योजना व अन्याय, पिळवणूकीपासुन त्यांना न्याय मिळवून देणार आहे. संघटनेचे अध्यक्ष महेश वसंतराव पाटील, सचिव महेंद्र पंडीत करनकाळे असुन अॅड. किरण जाधव हे कायदेशिर सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. सर्व कामगारांनी संस्थेचे कार्यालय दुकान नं.२, अल्पबचत भवन जवळ, पंचायत समिती समोर, चोपडा जि. जळगांव येथे संपर्क करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *