ताज्या बातम्या

जळगांव-तेलंगणाचे अन्नपुरवठा मंत्री मा.ना.श्री.रविंदरसिंगजी यांची चोपड्यात दमदार एंट्री…

लोकनायक न्युज प्रतिनिधी : विनायक पाटील

चोपडा – तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा, राष्ट्रिय अध्यक्ष मा.ना.श्री.के.चंद्रशेखर राव साहेब यांच्या प्रेरणेने गोरगांवलेचे माजी सरपंच, मार्केट कमेटीचे माजी संचालक व भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे सन्माननिय सदस्य मा.बापुसाहेब श्री.जगन्नाथ टि.बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.२७/७/२०२३ वार..गुरूवार रोजी स.१० वाजता संपुर्ण मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदु शस्रक्रिया महाशिबिर तसेच दुपारी २ वाजता बीआरएसची सभासद नोंदणी, पक्षप्रवेशाचा महामेळावा न.प.नाट्यग्रुह चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानिमित्ताने तेलंगणाचे अन्नपुरवठा मंत्री मा.ना.श्री.रविंदरसिंगजी यांची प्रमुख उपस्थिती लाभत आहे..चोपड्यात प्रथमच तेलंगणाचे मंत्रीमहोदय येणार असल्याने बीआरएसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांचे सोबत बीआरएसचे वरिष्ठनेते माजी आमदार श्री.शंकरअण्णा धोंडगेपाटिल, प्रदेशाध्यक्ष मा.श्री.माणिकराव कदमसाहेब, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री.नानासाहेबजी बच्छाव, सहसमन्वयक श्री.संदिपजी खुटेपाटिल, धुळे नंदुरबार जिल्हा समन्वयक एडव्होकेट श्री. अविनाश पाटिल, जळगाव समन्वयक श्री.देवेंद्र वराडे व पदाधिकारी मंडळी येत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील नांदेड सोलापुर नंतर चोपड्यात प्रथमच तेलंगणाचे केबिनेट मंत्री मा.ना.श्री.रविंदरसिंगजी यांची दमदार एंट्रि होत आहे.याची तालुकावासियांना उत्सुकता लागली आहे. कारण आदिवासी कोळी समाजाचे नेते श्री.जगन्नाथ टि.बाविस्कर हे नुकतेच हैदराबाद येथे बीआरएस पक्षप्रवेशासाठी जाऊन आलेत. त्यावेळेस त्यांनी अर्थमंत्री मा.ना.श्री.हरिशराव यांचेशुभहस्ते पक्षप्रवेश केला होता.व अन्नमंत्री मा.ना.श्री.रविंदरसिंगजी यांची स्नेहभेट घेतली होती. तेव्हाच त्यांनी सांगीतले होते की,”मी चोपड्याला जरूर येणार”. यासाठी श्री.नानासाहेब बच्छाव यांनी विशेष प्रयत्न केलेत.कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा महिला समन्वयक सौ.कोमलताई पाटिल व त्यांचे महिलामंडळ, चोपडा विधानसभा समन्वयक श्री.समाधानजी बाविस्कर, तालुका समन्वयक दिपकराव पाटिल व त्यांचे सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत. चोपडा पुण्यनगरीत आलेल्या अतिथींचे तालुकावासियांतर्फे स्वागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *