ताज्या बातम्या

जळगांव-दारुबंदी, पोलिस विभागाच्या नाकावर टिच्चून रावेर- पातोंडी येथे अवैध दारू विक्री

उत्पादन शुल्क विभाग ,पोलिस प्रशासनाचा धाक संपला

रावेर – रावेर पातोंडी गावातील व बाहेरील ढाबे, हॉटेल सह गावातील वाड्या वस्त्यांमध्ये खुलेआम गावठी पन्नी बनावट देशी विदेशी दारुची बिनबोभाट पोलिस प्रशासन उत्पादन शुल्क दारुबंदी विभागाच्या नाकावर टिच्चून रावेर तालुक्यातील पातोंडी रावेर पोलिस स्टेशनचे हद्दीत खुलेपणाने विक्री केली जात आहे.

जळगांव जिल्हा डिपीडीसीच्या बैठकीत अवैध दारुविक्री संदर्भात खुद्द आमदारांना च अवैध दारू विक्री अवैध धंदेवाईकांची तक्रार केली आणि पालकमंत्र्यांनी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीची कान उघडणी करीत कारवाई करण्याचे आदेश दिले. याचा अर्थ पोलिस प्रशासनाला अवैध धंदेवाईक जुमानत नाहीत का ?? या दोन नंबरीवरील पोलिस प्रशासन अधिकारी कर्मचारी यांचा धाक संपलाय की काय?? जणू चहापान टपरी सारखे विना परवाना अवैध दारू ची विक्रीकरीता रावेर तालुक्यातील रावेर पोलिस स्थानकांच्या हद्दीतील गावांमध्ये महामार्गावर विना परवाना होटल ढाबे व गावागावात किराणा पानटपरी सारखेच राजरोसपणे या अवैध देशी विदेशी गावठी पन्नी दारु विक्री ची दुकाने थाटली आहेत आणि खुलेआम विक्री केली जात आहे आणि संबंधित उत्पादन शुल्क विभागाचे व पोलिस प्रशासन व पोलिस कर्मचारी यांना अवैध धंदे . तसेच अवैध दारू विक्रीची ठावठिकाणे माहीत नसावीत का?? असलीच तर कायमची दारुविक्री बंद न करता थातुरमातुर कार्यवाही करीत त्याच जागी विना परवाना अवैध दारुविक्री ची मुभा का दिली जातेय ?जळगांव जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच जिल्हा उत्पादन शुल्क अधिक्षक अज्ञभिन्न आहेत का? या अवैध धंदे.अवै़ध विना परवाना गावठी पन्नी देशी विदेशी दारुचे अड्डे हॉटेल.ढाबे या वरील खुलेआम विक्री केली जात असलेली दारुविक्री.पत्त्यांचे क्लब कल्याण वरली सट्टा मटका पेढ्या बद्दल माहिती नसेल काय?? का आर्थिक चिकट पट्टी ओठांवर चिकटवलेली तर नाही ना?? जेणेकरून कारवाईचे आदेश तोंडून निघत नसतील का?जळगांव जिल्ह्यात अवैध धंदे वॉश आऊट मोहीम राबविण्याची आर्त हाक देत महामार्गावरील ढाबे हॉटेल्सवर होणारी अवैध बिंनधास्त राजरोसपणे खुलेआम विक्री केली जात असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी रावेर तालुक्यातील पातोंडी रावेर पोलिस स्थानकांच्या हद्दीतील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *