ताज्या बातम्या

जळगांव – धरणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडी संदर्भात बैठक संपन्न

धरणगाव – तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवड 26 जून रोजी होत असून या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सभापती निवडी संदर्भात सर्व अधिकार गुलाबरावजी पाटील साहेब यांना देण्यात आले सोबत असलेल्या शिवसेना भाजप व संजय पवार गट सर्वांना संधी दिली जाईल कोणावर अन्याय होणार नाही असे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांनी सांगितले या प्रसंगी आमदार चिमणराव पाटील,भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,जिल्हा बँकेचे चेअरमन संजय दादा पवार,भाजप जिल्हा उपाध्यक्ष पी सी आबा पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील, उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,मागासवर्गीय उपजिल्हा प्रमुख मुकुंद भाऊ नन्नवरे,भाजप जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल संजयभाऊमहाजन,भाजपाचे शेखर दादा पाटील,शिवसेना तालुका प्रमुख गजानन नाना पाटील,शिरीष आप्पा बयस,उप तालुका प्रमुख मोती आप्पा पाटील,भाजपा शहर प्रमुख दिलीपभाऊ महाजन,सचिव कन्हैया रायपूरकर,किशोर पाटील,चंदन पाटील, धारचे सुधाकर पाटील,नरेश पाटील, सुभाष पाटील बांभोरी, आबाभाऊ महाजन तसेच सर्व मार्केट कमिटीचे निवडून आलेले संचालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *