ताज्या बातम्या
जळगांव – धरणगाव येथील गुड शेपर्ड स्कुलचा दहावीचा १०० टक्के निकाल… ९१.४० टक्के गुण मिळवून मनस्वी पाटील प्रथम…
धरणगाव – येथील गुड शेपर्ड स्कुलच्या विद्यार्थांनी इयत्ता दहावीच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
अधिक माहिती अशी की यावर्षी गुड शेपर्ड स्कुलच्या एकूण २३ विद्यार्थांनी दहावीची परीक्षा दिली. सर्व च्या सर्व विद्यार्थांनी परीक्षा उत्तीर्ण होऊन शाळेच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. यामध्ये मनस्वी विजय पाटील (९१.४० प्रथम), जेद मुस्ताक खाटीक (९१.२० द्वितीय), मनस्वी प्रदीपकुमार पवार (९०.४० तृतीय) क्रमांक मिळवून यशस्वी झाले. दहावीच्या विद्यार्थांच्या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्यासह शिक्षक वर्गाने सदिच्छा व्यक्त केल्या. या विद्यार्थ्यांना जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, सपना पाटील, लक्ष्मण पाटील, सागर गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.