जळगांव – धरणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अतिक्रमणमुक्त करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी…..

नगरपालिकेचे मुख्याधिकारी व पोलीस प्रशासनाला दिले निवेदन…

प्रशासनाची योग्य कारवाई करण्याचे आश्वासन ……..
धरणगाव – शहरातील मुख्य उड्डाण पुलाला लागून असलेल्या छ.शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा व संपूर्ण छ.शिवाजी व्यापारी संकुलाच्या आजूबाजूला झालेल्या अतिक्रमणाबाबत धरणगाव शहर काँग्रेस कमिटीने आज निद्रीत असलेल्या पालिका व पोलीस प्रशासनाचे जोरदार लक्ष वेधले. विशेष करुन पालिका इमारतीच्या एकदम समोर आणि पोलिस स्टेशनाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या विशेष करुन या संपूर्ण परिसरात सर्वत्र व्यापारी, हातगाडीवाले आदींनी अतिक्रमण केले असून त्यामुळे वाहतुकीशी संबंधित व वाहने व पादचाऱ्यांना नाहक जीवघेण्या समस्या व समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील या भागा व्यतिरिक्त, धरणी चौक,बाजार पेठ,कोटबाजार सकट संपूर्ण गावात अतिक्रमण धारयांचा कलकलाट आणि गर्दी ने गजबजून गेलेल्या आवाजाही (ट्रैफिक) चाबोजवारा उड़ालेला आहेया बेशिस्त वाहतुकीबाबत आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांना निवेदन देण्यात आले.उक्त निवेदनात संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली असून बेशिस्त वाहतुकीवर कडक दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे, कारण बेशिस्त वाहतूक ही अशी आहे. समोरच ३/४ प्राथमिक शाला,हाईस्कूल तसेच महाविद्यालय आहे,विद्यार्थी एवम महीलान्ना येजा कर्तान्ना जीव मुठीत धरून चालावे लागते, रुग्णवाहिकेलाही वेळेवर जागा मिळत नाही आणि त्यामुळे खूप त्रास होतो.या संपूर्ण समस्येबाबत धरणगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पोलीस व पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले!भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने आज विनंती वजा निवेदन दिले । निवेदन शहराध्यक्ष अनंत (बापू) परिहार, ओबीसी काँग्रेस सेलचे शहराध्यक्ष रामचंद्र महाजन, कार्यकर्ते दिनेश पाटील, गौरव चव्हाण,निखिल न्हायदे यांनी पालिका प्रशासन, जनार्दन पवार आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यालयात जावुन दिले!त्याचबरोबर चर्चा करुन त्यांनी सर्व मुद्दे समजून घेतले असून, काँग्रेस कमिटीने सांगितल्याप्रमाणे पालिका आणि पोलिस प्रशासन तातडीने योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.