ताज्या बातम्या

जळगांव – धरणगाव येथे नववर्षाचे जल्लोषात स्वागत

सर्व पक्ष, संघटना व गावकऱ्यांनी नोंदवला सहभाग

धरणगाव : येथील बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाच्या वतीने गुडीपाडव्यानिमित्त नववर्षाची स्वागत मिरवणूक जल्लोषात पार पडली.बालाजी मंदिराजवळ भगवानदास महाराज, पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले, बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डी. आर. पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, जीर्णोद्धार समितीप्रमुख जीवन बयस, मंगळाचे जेष्ठ सदस्य ध्रृवसिंग बयस, आर. डी. महाजन, सचिव प्रशांत वाणी तसेच खजिनदार किरण वाणी, अॅड. वसंतराव भोलाने व ग्रामस्थांच्या हस्ते गुढीचे पूजन झाले. टाळ-मृदुंगाच्या गजरात बाळगोपाळांनी ठेका धरत मिरवणुकीची शोभा वाढवली. स्वयंसेवक संघ पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, भाजपचे शिरीष बयस, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, माळी समाजाचेअध्यक्ष विठोबा महाजन, भाजपा गटनेता कैलास माळी, नगरसेवक भागवत चौधरी, रतीलाल चौधरी, पूनीलाल महाजन, हिरालाल महाराज, कडू महाजन, रविंद्र महाजन, ॲड. शरद माळी, अमोल महाजन, अनिल महाजन, विनोद रोकडे, गणेश महाजन यांची उपस्थिती होती. माऊली वारकरी शिक्षण संस्था, सावता माळी भजनी मंडळ, ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था यांचे सर्व टाळकरी सहभागी झाले होते. मिरवणूक यशस्वी होण्यासाठी खजिनदार किरण वाणी, प्रशांत वाणी, भास्कर मराठे, शाम भाटिया, अरूण महाले, गणेश सिकरवार तसेच सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी यांनी केले. संचालक आर. डी. महाजन यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. डी. आर. पाटील यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *