ताज्या बातम्या

जळगांव : पाचोरा तालुका राष्ट्रवादीने एप्रिल फुल दिनानिमित्त ‘मोदींच्या फसव्या विकासाचा वाढदिवस’ केला साजरा

पाचोरा : एप्रिल फुल’ दिनाचे औचित्य साधुन मा.आ.दिलीप भाऊ वाघ यांच्या आदेशाने व मा.न.पा.गटनेते नानासाहेब संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नरेंद्र मोदी यांच्या फसव्या जुमलेबाजी विरुध्द केक कापून निषेध व्यक्त करण्यात आला.
महागाई, बेरोजगाच्या विरोधात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमाम देशवासीयांच्या तोंडाला पाने पुसली असल्याने १ एप्रिल दिनाचे औचित्य साधुन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नरेंद्र मोदी यांच्या फसव्या जुमलेबाजी विरुध्द जोरदार घोषणाबाजी करत नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला केक दाखवुन निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समितीचे मा. सदस्य ललित वाघ, युवा नेते गौरव वाघ, रा. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिजीत पवार, शहर अध्यक्ष सुदर्शन महाजन, व्ही. जे. एन. टी. सेलचे युवक शहर अध्यक्ष राहुल राठोड, गौरव वाघ, विद्यार्थी तालुका अध्यक्ष हरिष पाटील, निलेश पाटील, सुनिल पाटील, प्रदीप वाघ, नितीन पाटील, ललित पाटील, अशोक सोन्नी, उत्तम समारे, तेजस पाटील, माणिक पाटील, अॅड. अविनाश सुतार, गणेश पाटील,हेमंत पाटील, रोषन पाटील, छोटु पाटील, ऋषिकेश पाटील, बंटी पाटील सह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देशात दिवसेंदिवस वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यां विरुध्द अवलंबिले जाणारे धोरण याचा निषेध नोंदवत आज १ एप्रिल रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात “मोदींचा फसव्या विकासाचा वाढदिवस” राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे घोषणाबाजी करत तसेच केक वाढवुन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांनी महागाईचे काय झाले… एप्रिल फुल.. एप्रिल फुल…, बेरोजगारीचे काय झाले.. एप्रिल फुल.. एप्रिल फुल.., गॅस दरवाढीचे काय झाले… एप्रिल फुल.. एप्रिल फुल…, शेतकऱ्यांच्या कापसाचे काय झाले एप्रिल फुल… एप्रिल फुल…अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. तसेच उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला केक दाखवुन १ एप्रिल दिनानिमित्त वाढदिवस साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *