ताज्या बातम्या
जळगांव-पातोंडी येथे भोकर नदीला महापूर आल्याने पिकासह शेती गेली वाहून
जळगाव लोकनायक न्युज प्रतिनिधि उमेश कोळी
रावेर – तालुक्यातील पातोंडी येथील रहिवासी धनराज पंडित बोरसे, व त्यांचे दोन भाऊ असे तीन लोकांची शेती भोकर नदी काठावर असून त्यांच्या शेताजवळ नदी पात्रामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा योजनेच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला आहे.परंतु सदरील बंधारामुळे पाण्याच्या प्रवाहात मोठा अडथळा निर्माण होत असून नदीकाठावरील शेतात नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने पिकांसहित एक ते दीड एकर शेती वाहून गेले आहे.यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने शेताचे पंचनामे करून त्वरित मदत द्यावी अशी मागणी शेतकरी धनराज बोरसे,रवींद्र बोरसे, सोपान बोरसे यांनी केली आहे.