ताज्या बातम्या

जळगांव – प्रा.डॉ प्रसन्न सुरेश देशमुख राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित

मुक्ताईनगर – संत मुक्ताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी कार्यरत असलेले प्रा.डॉ. प्रसन्न सुरेश देशमुख यांना राजनंदिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था जळगाव तर्फे राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्काराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवन जळगाव या ठिकाणी करण्यात आले होते.राजनंदिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था जळगाव विविध प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, साहित्य, कृषी व पर्यावरण यामध्ये पुरस्कार देते. प्रा. डॉ. प्रसन्न सुरेश देशमुख यांनी पर्यावरण कार्यक्षेत्रात पर्यावरणावर विविध लेख, व्याख्याने व मार्गदर्शन, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पर्यावरण रक्षणासाठी राबविलेले विविध उपक्रम जनजागृती केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्षा सौ. संदिपा ज्ञानेश्वर वाघ, कार्याध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर वाघ तसेच व्यासपीठावर उपस्थित जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, ज्येष्ठ साहित्यिक सौ. कुंदाताई कुलकर्णी, कृषी सेवक सतीश पाटील, तसेच लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील मान्यवर उपस्थित होते.संत मुक्ताबाई महाविद्यालय मुक्ताईनगर संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब दादा शेखावत व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय डी पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *