ताज्या बातम्या

जळगांव – बोदवड़ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मा.श्री. गोपालजी अग्रवाल यांनी मानसिक रुग्णांना अन्नदान करून लग्नाचा ५० वा सुवर्ण वाढदिवस केला साजरा

जळगाव – उमेश कोळी (लोकनायक न्युज)

श्री.गोपाल अग्रवाल बोदवड आणि त्यांच्या पत्नी सौ.सुशीला अग्रवाल यांनी त्यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बोदवड येथील आत्मसम्मान फाऊंडेशन मध्ये २७ पुरुष आणि १३ महिलांसह मानसिक आजारी व्यक्ती, काही अपंग आहेत. काहींना त्यांच्या स्मरणशक्तीचा विसर पडला आहे, तर काहींची स्मरणशक्ती गेली आहे. त्यापैकी काही आजारी आहेत अशा 40 व्यक्तींना आमरस पुडीचे जेवण देऊन कुटुंबासोबत आनंदोत्सव साजरा केला. उपस्थितांनी त्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी, आत्मसम्मान फाऊंडेशनचे संचालक श्री.डॉ.विजय पाटील व त्यांच्या पत्नी सौ पाटील यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.आज मनोरुग्ण दिन आहे.श्री.बाळू प्रल्हाद सुरवाडे यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर त्यांना सन्मानपूर्वक घरी पाठवण्यात आले.

त्याप्रसंगी आत्मसम्मान फाउंडेशनचे संचालक डॉ.विजय पाटील, त्यांच्या पत्नी सौ.चौधरी, मा.श्री.गोपालजी अग्रवाल, त्यांच्या पत्नी सौ.सुशीला अग्रवाल, मुलगा गौरव अग्रवाल, सुन रूपाली अग्रवाल, नातू अनक अग्रवाल, नात अवनी अग्रवाल, संजय अग्रवाल, अनीता अग्रवाल, मिट्ठूलाल अग्रवाल, शाम गुप्ता, अतुल अग्रवाल, सुनील गुप्ता, गजानन अग्रवाल, मीनादेवी गुप्ता, पुष्पादेवी गुप्ता, विलास तेली, अमोल तेली उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *