ताज्या बातम्या

जळगांव – भोद बु ता.धरणगाव येथे विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू

धरणगाव – तालुक्यातील भोद बुद्रुक येथे काल दुपारी १२ वाजेच्या सुमारास अनिता देविदास रायभान पाटील यांच्या मालकीचा बैल त्यांच्या शेतातील गट नंबर ८४ मध्ये शेतीची मशागत करीत असताना विजेच्या खांब्याला ताण दिलेल्या तारेला स्पर्श होहून धक्का लागून जागेवरच मृत्युमुखी पडला. याठिकाणी थोडक्यात मनुष्य हानी झाली नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.परिसरातील बऱ्याच ठिकाणी विजेच्या तारा लोंबकल्या आहेत, तर काही ठिकाणी खांबे जमिनीलगत वाकलेले आहेत. तरी महावितरण अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्या तारा व्यवस्थित कराव्यात अन्यथा मोठी जीवित हानी होईल.

होणाऱ्या या घटनांना जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरीक, शेतकरी उपस्थित करीत आहेत.

2 Comments

  1. मोदी या.धरणगाव येथील शेतकरी शेतात काम करतांना विजेचा खांबाला दिलेल्या ताण यामधील विजेच्या शाॅक लागुन त्या शेतक-याचा बैल मरण पावला.त्या शेतक-याचे या पुढील शेतीची कामे कशी होतील.शासनाने ,महावितरण ने त्या शेतक-याला ताबडतोब एका बोला ची किंमती एवढी मदत करुन शेतक-या बद्दल सहानुभूती दाखवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *