ताज्या बातम्या

जळगांव – भोळे महाविद्यालयात अमली पदार्थांचे सेवनाचे दुष्परिणाम आणि अवैध तस्करी विरोधात आंतरराष्ट्रीय दिन साजरा

भुसावळ – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात आज दिनांक 01/07/2023 रोजी सकाळी 11 वा अमली पदार्थांचे सेवनाचे दुष्परिणाम आणि अवैध तस्करी विरोधात आंतरराष्ट्रीय दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. संजय डी. चौधरी व प्रा‌ अनिल सावळे होते, सदर कार्यक्रमाचे आयोजन एन‌. एस .एस विभागातर्फे करण्यात आले होते.

प्रा डॉ संजय चौधरी यांनी अमली पदार्थांचे सेवनाचे दुष्परिणाम बाबत मार्गदर्शनात सांगितले की, नशा देणाऱ्या पदार्थाचे किंवा मादक पदार्थाचे सेवनाने मानवी शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन गुंगी/निद्रा येते, शरीराचे अवयव शिथिल पडतात, ग्लानी येणे विचारशक्तीचा ऱ्हास इत्यादी प्रकार घडतात. मात्र मादक पदार्थाच्या सेवनाने मनावरील दडपण काही काळापुरते निघून जाते किंवा कमी होते. या मादक द्रव्याची मग शरीराला सवय लागते.अमली पदार्थ वेळेवर न मिळाल्याने किंवा महाग झाल्याने युवकांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे. यात महाराष्ट्रातील युवकांचा क्रमांक वरचा आहे. आपले जीवन सुंदर आहे ते एकदाच मिळत असते. अमली पदार्थांपासून दूर राहून आपले जीवन सुंदर बनवा. आरोग्याला महत्त्व द्या… व्यायाम करा…खेळ खेळा…पण अमली पदार्थांना थारा देऊ नका, समाजात व महाविद्यालयात याबाबत प्रचार प्रसार करून नव युवक विद्यार्थी यांच्यात जागृती निर्माण करा असे प्रतिपादन केले *प्रा अनिल सावळे* यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेली अमली पदार्थ तस्करी याबाबत आपले विचार मांडले व अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या साठी व्यक्तिगत समुपदेशन करणार असे सांगितले कार्यक्रमाची प्रस्तावना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर बी ढाके यांनी केली सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण यांनी केले आभार महिला कार्यक्रमाधिकारी डॉ.माधुरी पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रमास विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. राजेंद्र भोळे प्रा. अनिल नेमाडे प्रा. एस एस पाटील श्री प्रकाश सावळे श्री राजेश पाटील उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *