ताज्या बातम्या

जळगांव – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा ९१.४८ % निकाल

धरणगांव – श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ जळगांव संचलित सुवर्ण महोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा एस.एस.सी. बोर्डाचा निकाल ९१.४८ % लागला असून शाळेतून प्रथम कीर्ती वसंत सैंदाणे – ९०.२० %, द्वितीय दामिनी रवींद्र पाटील – ८७ % , तृतीय नीलिमा संजय महाजन – ८६ %, चतुर्थ हर्षदा हरीश महाजन – ८५.४० %, पाचवी सोनाली रविंद्र पाटील – ८५.२० % यांचा समावेश आहे. परीक्षेला एकूण ४७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. ४७ पैकी ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन १९ विद्यार्थी विशेष प्राविण्य , १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *