ताज्या बातम्या

जळगांव – मोदी सरकारच्या ९ वर्ष पुर्तीबद्दल मोदी@९ “महा-जनसंपर्क अभियान” अंतर्गत भाजपा तर्फे “व्यापार व उद्योग आघाडी” स्नेहसंमेलनाचे भुसावळ येथे आयोजन

जळगाव प्रतिनिधी – उमेश कोळी

देशाचे प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाले असून, या निमत्ताने देशभरात भाजपा मार्फत मोदी@9 “महाजनसंपर्क अभियान” सुरू आहे. या अनुषंगाने आज भाजपा भुसावळ तर्फे “व्यापार व उद्योग आघाडी स्नेहसंमेलन” कार्यक्रमाचे भुसावळ येथे माजी कृषी मंत्री कर्नाटक मा. अरविंद लिंबावली, खा. रक्षाताई खडसे व आ. संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले.

यावेळी माजी कृषी मंत्री कर्नाटक मा. अरविंद लिंबावली, खा. रक्षाताई खडसे व आ. संजय सावकारे यांनी उपस्थित भाजपा व्यापारी आघाडी पदाधिकारी, व्यापारी बंधू यांना संबोधून मोदी सरकार मार्फत उद्योग क्षेत्रात करण्यात आलेल्या निर्णयांचा व विविध विकास कामांचा लेखजोखा मांडला. व मोदी सरकारच्या कामकाजाविषयी व्यापारी बंधूचे वैयक्तिक अनुभव जाणून घेण्यात आले. तसेच मोबाईल क्र.९०९०९०२०२४ वर मिस कॉल देऊन प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांना पाठींबा देण्याचे आव्हाहन करण्यात आले.

यावेळी भुसावळ भाजपा शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, माजी नगरसेवक मनोज बियाणी, श्रीकांत लाहोटी, केशव गेलाणी, गोलू पाटील, शहर सरचिटणीस रामशंकर दुबे, माजी नगरसेवक सतीश सपकाळे, अजय नागराणी, भाजयुमो शहर सरचिटणीस श्रेयस इंगळे, श्याम दरगड, किरण महाजन, ॲड.प्रकाश पाटील, प्रशांत पाटील, विकास पांचपांडे, शहर सरचिटीस संदीप सुरवाडे ई. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *