जळगांव – यावल येथे भाजपाची ‘लोक कल्याण योजना महा जनसंपर्क व बुथ सशक्तीकरण अभियान’ संपन्न
प्रतिनिधी उमेश कोळी
जळगाव – यावल येथे आगामी निवडणुकांना लक्षात घेऊन बुथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत बुथ रचना मजबूत करण्याच्या दुष्टीने रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा ची “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक” आज यावल येथील महर्षि व्यास मंदिर सभागृह येथे खा. रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली.सदर बैठकीत यांची उपस्थित भाजपा यावल तालुका प्रमुख पदाधिकारी, बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांना बुथ सशक्तीकरण तसेच केंद्र व राज्य स्तरावरून पक्षामार्फत आलेल्या विविध आगामी कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करून माहिती दिली. यावेळी मोदी सरकारच्या ९ वर्ष पुर्तीबद्दल “महा जनसंपर्क अभियान” बद्दल माहिती देऊन, केंद्र सरकारच्या योजनाच्या लाभ घेतलेल्या लाभार्थ्याशी संपर्क करणे बाबत सांगितले, तसेच उपस्थित बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांना सुधारित नूतन मतदार यादी किट वाटप करण्यात येऊन मार्गदर्शन केले.यावेळी खा. रक्षाताई खडसे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष श्री.हिरालाल चौधरी, श्री.शरद महाजन, जिल्हाध्यक्ष किसन मोर्चा श्री.नारायणबापू चौधरी, जिल्हा सरचिटणीस व बाजार समिती सभापती श्री.हर्षल पाटील, श्री.भरत महाजन, श्री.नरेंद्र नारखेडे, माजी जि.प.सदस्य सौ.सविता भालेराव, सौ.कांचन फालक, जिल्हा दूध संघ संचालक श्री.नितीन चौधरी, जिल्हा बँक संचालक श्री.गणेश नेहते, माजी सभापती पं.स.सभापती सौ.पल्लवी चौधरी, तालुकाध्यक्ष श्री.उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस श्री.विलास चौधरी, श्री.उज्जैनसिंग राजपूत, डॉ.कुंदन फेगडे, श्री.पुरोजीत चौधरी, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री.सागर कोळी, शहराध्यक्ष यावल श्री.निलेश गळे, फैजपूर शहराध्यक्ष श्री.अनंत नेहेते, श्री.पी.एच.सोनवणे सर, महिला आघाडी अध्यक्षा सौ.जयश्री चौधरी, परसाळे सरपंच सौ.मीना तडवी, बाजार समिती संचालक श्री.राकेश फेगडे, श्री.विलास नाना पाटील, श्री.उमेश पाटील, श्री.सूर्यभान पाटील सर, श्री.सागर महाजन, श्री.दीपक चौधरी, श्री.पंकज चौधरी, श्री.संजय पाटील, श्री.यशवंत तळेले, सौ.राखी बऱ्हाटे, श्री.हेमराज फेगडे, श्री.किरण महाजन, भाजयुमो शहराध्यक्ष श्री.रितेश बारी, श्री.परेश नाईक, श्री.नितीन नेमाडे, सौ.सीमा वाघ, श्री.खेमचंद कोळी ई. उपस्थित होते.