जळगांव जिल्हा
जळगांव येथे आयोजित ‘महायुती’ चा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न
जळगाव प्रतिनिधि, उमेश कोळी
आगामी लोकसभा निवडणुकीत “महाविजय 2024” च्या अनुषंगाने प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्ता स्थापन करणेसाठी आज भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, रासाप व मित्रपक्ष यांचा “महायुती – जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा” चे पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री श्री.गिरीषजी महाजन व मंत्री श्री.अनिलजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला असता, भाजपा पदाधिकारी म्हणून जिल्ह्यातील सहकाऱ्यांसह खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून, उपस्थित महायुतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमोर आपले विचार मांडून मार्गदर्शन केले.
यावेळी महायुतीतील जिल्ह्यातील मंत्री महोदय, खासदार, आमदार, मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.