ताज्या बातम्या

जळगांव-रावेर नागझिरी पुलाच्या कामाला आठ दिवसात सुरुवात होणार : मंत्री गिरीश महाजन

जळगाव उमेश कोळी (लोकनायक न्युज)

जळगाव . रावेर शहरातील जुना सावदा रोडवरील नागझिरी पुलाच्या बांधकामाला येत्या आठ दिवसात सुरुवात होऊन सहा महिन्यात पुलाचे काम पूर्ण होईल अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या नदीच्या पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झालेल्या माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील यांच्या कुटुंबीयांची मंत्री महाजन यांनी भेट घेऊन सांत्वन केले. तहसीलदार बंडू कापसे यांनी पुरात तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्री महाजन यांना यावेळी दिली. त्यावेळी आर्थिक मदतीचे तिघांचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना तहसीलदारांना महाजन यांनी दिल्या आहेत.त्यानंतर त्यांनी या नदीवरील जीर्ण झालेल्या पुलाची पाहणी केलीयावेळी भाजपचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, माजी जिल्हा परिषदउपाध्यक्ष नंदकिशोर महाजन भाजपचे उपाध्यक्ष पद्माकर महाजनप्रल्हाद पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, सरचिटणीस सी एसपाटील, शहराध्यक्ष दिलीप पाटील, उमेश महाजन गट नेते पी.के. महाजन पंचायत समितीचे माजी सभापती जितू पाटील, तालुका उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे, युवा मोर्चाचे पाटील, योगेश गजरे, प्रिंतु राणे दुर्गादास पाटील शुभम पाटील प्रवीण पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *