जळगांव – रावेर येथे लोक कल्याण योजना पोहोचविण्यासाठी“महा जनसंपर्क अभियानचे आयोजन
प्रतिनिधी – उमेश कोळी
जळगांव – आगामी निवडणुकांना लक्षात घेऊन “महा जनसंपर्क अभियान” अंतर्गत भाजपा रावेर लोकसभा क्षेत्र जळगांव जिल्हा नियोजन बैठक आज तामसवाडी (रावेर) येथील ओंकारेश्वर मंदिर येथे उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा प्रदेश सरचिटणीस श्री.विजय चौधरी व रावेर लोकसभेच्या खा. रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली.सदर बैठकीत प्रमुख भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांसह रावेर लोकसभा क्षेत्रातील रावेर, तालुक्यातील भाजपा तालुका प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना “महा जनसंपर्क अभियान” बद्दल माहिती देऊन, केंद्रातील मोदी सरकार च्या देशहिताच्या, विकासाच्या व लोककल्याणाच्या योजना व कार्य भाजपा कार्यकर्त्यांनी घरोघरी जनसंपर्क करून सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून सदर अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच पक्ष कार्या संबंधी विविध मुद्दे बैठकीत मांडून सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष श्री.अशोक कांडेलकर, प्रदेश चिटणीस व जळगाव जिल्हा प्रभारी श्री.अरुण मुंडे, प्रदेश चिटणीस श्री.अजय भोळे, डॉ.राजेंद्र फडके, श्री.सुरेश धनके, माजी जि.प.अध्यक्ष सौ.रंजना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री.नंदकिशोर महाजन, श्री.प्रल्हाद पाटील, श्री.पद्माकर महाजन, श्री.राकेश पाटील, माजी जि.प.सदस्य श्री.शांताराम आबा पाटील, श्री.गोविंद अग्रवाल, श्री.शरद महाजन, डॉ.अतुल सरोदे, जिल्हा सरचिटणीस श्री.हर्षल पाटील, संघटन सरचिटणीस श्री.सचिन पानपटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, श्री.शिवाजी पाटील, रावेर तालुकाध्यक्ष श्री.राजन लासूरकर, माजी जि.प.सदस्य सौ.सविता भालेराव, माजी जि.प.सदस्य सौ.गोमती बारेला, श्री.दुर्गादास पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष श्री.प्रफुल जवरे, यावल तालुकाध्यक्ष श्री.उमेश फेगडे, चोपडा तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष श्री.चंद्रकांत बाविस्कर, बोडवड तालुकाध्यक्ष श्री.प्रभाकर पाटील, श्री.सुनील काळे, श्री.गोपाळ नेमाडे, श्री.रवींद्र झाल्टे, श्री.महेश चौधरी, श्री.सी.एस.पाटील सर, श्री.पी.के.महाजन, श्री.महेश पाटील, श्री.भरत सोनगिरे, भाजयुमो रावेर तालुकाध्यक्ष श्री.महेंद्र पाटील, श्री.विजय महाजन, श्री.हरलाल कोळी, सौ.रेखा बोंडे, सौ.सारिका चौहान, श्री.विलास चौधरी, श्री.चंद्रकांत भोलाणे श्री.चंद्रकांत पाटील, श्री.शुभम पाटील, श्री.पंकज कोळी, श्री.अमोल पाटील, सौ.नेहा गाजरे, श्री.नथ्थू धांडे, श्री.राजेंद्र पाटील, श्री.उमेश कोळी, ई. उपस्थित होते.