जळगांव – रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत रावेर शहर येथे खा.रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत भाजपच्या “संपर्क से समर्थन” अभियानाचा शुभारंभ
जळगाव उमेश कोळी (लोकनायक न्युज)
देशाचे प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपा तर्फे “संपर्क से समर्थन” अभियानाची रावेर लोकसभा क्षेत्रातील रावेर विधानसभा अंतर्गत रावेर शहर येथे खा. रक्षाताई खडसे, उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चाचे श्री.सुरेश धनके, रावेर लोकसभा निवडणुक प्रमुख श्री.नंदकिशोर महाजन व भाजपा प्रदेश चिटणीस श्री.अजय भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.यावेळी रावेर तालुका प्रमुख भाजपा पदाधिकारी यांनी रावेर शहरातील श्री.दिलीप पाटील, डॉ.प्रवीण चौधरी (समृद्धी हॉस्पिटल), डॉ.किशोर महाजन (दृष्टी हॉस्पिटल), श्री.अशोकशेट वाणी, श्री.अनिलशेट अग्रवाल (माजी उपनगाध्यक्ष), श्री.प्रकाश मुजुमदार (रावेर शिक्षण संवर्धक संघ रावेर अध्यक्ष व ब्राम्हण समाज अध्यक्ष), श्री.भास्कर महाजन (शुभांगी कन्स्ट्रक्शन), श्री.वासुदेव रामदास महाजन ई. यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन “मोदी सरकार” मार्फत जनसामान्यपासून तर विविध क्षेत्रात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लेखा जोखा मांडण्यात आला व माहिती पत्रक वाटप करण्यात आले, तसेच जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येऊन, मोदी सरकारच्या कामकाजाविषयी वैयक्तिक अनुभव जाणून घेण्यात आले. तसेच मोबाईल क्र.९०९०९०२०२४ वर मिस कॉल देऊन प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांना पाठींबा देण्याचे आव्हाहन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री.पद्माकर महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, रावेर लोकसभा संयोजक श्री.सुनिल पाटील, तालुकाध्यक्ष श्री.राजन लासूरकर, तालुका सरचिटणीस शे.महेश चौधरी, श्री.सी.एस.पाटील, माजी सभापती श्री.जितेंद्र पाटील, श्री.महेश पाटील, श्री.पि.के.महाजन, श्री.संदीप सावळे, श्री.दुर्गादास पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री.महेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष श्री.वासू नरवाडे, श्री.उमेश महाजन, श्री.शुभम पाटील, श्री.नितीन पाटील, श्री.चेतन पाटील, श्री.उमाकांत महाजन, श्री.अजिंक्य वाणी, श्री.उमेश कोळी, श्री.नितीन पाटील, श्री.राजेंद्र पाटील, श्री.नंदकिशोर बडगुजर, श्री.अशोक शेट वाणी, श्री.अनिल अग्रवाल ई. उपस्थित होते.