जळगांव – शिक्षकांची बदली थांबविण्यासाठी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांसह मुख्याध्यापक आणि लिपिकास लाच स्वीकारतांना अटक
जळगाव – शिक्षकांच्या बदली थांबवण्यासाठी दोन शिक्षकांकडून चक्क धनादेशापोटी ७५ हजारांची लाच मागून अॅडव्हान्समध्ये धनादेश स्वीकारताना यात तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे.एरंडोलच्या एका शिक्षण संस्थेतून दुसर्या शिक्षण संस्थेत होणारी बदली थांबवण्यासाठी दोन शिक्षकांकडून धनादेशापोटी ७५ हजारांची लाच मागून अॅडव्हान्समध्ये धनादेश स्वीकारणार्या एरंडोल शहरातील सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन (वय ५६), मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव (वय-४२), लिपिक नरेंद्र उत्तम वाघ (वय-४४) यांना जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अटक केल्याने जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर असे की, श्री.सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचलीत महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे उप शिक्षक या पदावर कार्यरत असलेले तक्रारदार यांची व त्यांचे उप शिक्षक या पदावर कार्यरत असलेले सहकारी मित्र अशा दोघांची बदली दि.०१/०४/२०२३ रोजी एरंडोल हायस्कूल येथून महात्मा फुले हायस्कुल, धरणगाव येथे करण्यात आल्या बाबतचा मंजुरीसाठीचा प्रस्ताव दि.०२/०५/२०२३ रोजी शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांचे कडे पाठविलेला होता. सदर तक्रारदार यांची व त्यांचे सहकारी उप शिक्षक मित्र अशा दोघांची बदलीस स्थगिती मिळणेसाठी व पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशा आशयाचे संस्थेचे पत्र शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांचे नावे देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक व कनिष्ठ लिपिक यांनी तक्रारदार यांचेकडे व त्यांचे सहकारी उप शिक्षक यांचेकडे पंचासमक्ष स्वतःसाठी व संस्थेचे अध्यक्ष यांच्यासाठी दोघांचा पुर्ण महिन्याचा एक पगार म्हणजेच तक्रारदार यांना ७५,०००/-रुपये चेक स्वरूपाने लाचेची मागणी करून ती चेक स्वरूपात घेणार असल्याचे सांगितले व मागणी केल्याप्रमाणे ७५,०००/-रू.चा मुख्याध्यापक यांचे नावे असलेला चेक मुख्याध्यापक यांनी महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.यांचा कारवाईत सहभागजळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागा चे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, ईश्वर धनगर, सचिन चाटे, रवींद्र घुगे, सुनील पाटील, पोलीस निरीक्षक एस.के.बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.