ताज्या बातम्या

जळगांव – हजरत उमर फाउंडेशनच्या वतीने तांबापुरा येथे शालेय साहित्याचे वाटप

अस्लम काकर (लोकनायक न्युज)

जळगांव – हजरत उमर फाउंडेशन चा उपक्रम दिनांक ९ जुलै रविवारी पंचशील नगर ( तांबापुरा ) येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्या पाणी बॉटल वाटप कार्यक्रम सामाजिक संस्था हजरत उमर फॉउंडेशन तर्फे मोहम्मद अली जोहर अरबी मदरसा पंचशील नगर ( तांबापुरा ) येथे यशस्वी रित्याने पार पडले.

या कार्यक्रमाचा लाभ एकूण ८० विद्यार्थ्यांनी घेतला असून या कार्यक्रम चे अध्यक्ष म्हणून शिक्षण सम्राट डा. अब्दुल करीम सालार उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात सालार साहेबांनी आजचे हे प्रगतीशील जगात शिक्षण किती महत्वाचे या बाबत उपस्थित विद्यार्थी व त्यांचं पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून असलेले एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अनिस शेख यांनी ही शिक्षित होऊन आपण समाजात क्रांती घडवू शकतो ज्याच्या मुळे फक्त आपलाच नव्हे तर आपले येणारी पिढी सह देशा चा ही कशा प्रकारे फायदा होईल या बाबत अमूल्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमात सुनील महाजन ( मनपा विरोधी पक्ष नेता ) डी. आर. एस. नदीम खान डॉ. इम्रान खाटीक. डॉ. नदीम नजर.अडव्होकेट मजर पठाण. डॉ हिना मॅडम तसेच अलफैज फौंडेशन चे मुश्ताक सालार शिरसोली चे ग्राम पंचायत सदस्य अकील मेंबर यांची ही उपस्थिती होती या उपक्रम ला यशस्वी करण्यासाठी हजरत उमर फौंडेशन चे इस्माईल खान विकार खान अहेमद खान के. जी. एन मल्टीपर्पज सोसायटी चे अध्यक्ष अस्लम काकर अब्दुल बासीत शरीफ शाह बापू फौंडेशन चे आसिफ शाह बापू सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख लुकमान भाई अब्दुल लतीफ भाई इरफान पटवे इम्रान काकर इकबाल पेंटर मोहसीन काकर फारुख पटेल अहेमद पिंजारी असीम शेख रईस शाह सह सोनू काकर यांनी परिश्रम घेतलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *