ताज्या बातम्या

जळगावच्या वैभवात भर घालणारा मेहरुण तलाव बनलं घानिकचे साम्राज्य

जळगांव – जिल्ह्याचे ठिकाण असलेले मुख्य शहर जळगाव यात वैभवात भर घालणारा आणि लोकांचा आकर्षण असलेला मेहरुण तलाव पूर्णपणे कचराकुंडी झालाय, कारण या ठिकाणी असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी व गणेश घाटावर विविध पूजा करण्यासाठी आणि विविध पर्यटक फिरण्यासाठी येत असतात.

या ठिकाणी हे भाविक आणि पर्यटक आपली मौजमजा करण्यासाठी हा परिसर अस्वच्छ करतात, या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याचे प्रदूषण, निर्माल्याचे प्रदूषण, पूजा साहित्य, प्लास्टिक असे बरेच काही अस्तव्यस्त पडलेले दिसून आले, स्वतंत्र कचराकुंडी असून सुद्धा त्या ठिकाणी लोक आजूबाजूला कचरा फेकतात.

पूजा करणारे असंख्य भाविक पूजा करून झाल्यावर त्याच ठिकाणी निर्माल्य टाकून देतात, तसेच एका बाजूला मासे पकडणारे लोक आणि मासे यांना पाव व कणकेचे गोळे त्या ठिकाणी देण्यासाठी येत असतात, काम झाल्यावर ते तिथेच टाकून देतात त्यामुळे खूप दुर्गंधी पसरते, हे सर्व काही उचलून घेण्याची कोणीच तसदी घेत नाही, त्या ठिकाणी असलेल्या मंदिरांमध्ये कुत्रे बसलेले दिसून आले, तसेच इतर जनावरे सुद्धा आजूबाजूला असल्यामुळे त्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि कचरा दिसून आला. या सगळ्या गोष्टींकडे स्थानिक लोकांचे आणि महानगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. गणेश घाट या घाटावर बसू सुद्धा वाटत नाही इतकी दुर्गंधी या घाटावर पसरलेली आहे. जनावरांची विष्ठा, निर्माल्य – प्रसाद त्या ठिकाणी आढळून आले, असा वैभवात भर घालणारा आणि जळगावचा आकर्षण असलेला मेहरुण तलाव घाणीचा साम्राज्य बनलेला आहे, या ठिकाणी नव्याने येत असलेले पर्यटक आणि भाविक यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. एकेकाळी मेहरून तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी खूप लढत होते परंतु आज कोणीही या अस्वच्छतेबद्दल आणि प्रदूषणाबद्दल लोकप्रतिनिधींना गणेश घाट पाहायला सुद्धा वेळ नाही. महानगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष या ठिकाणी आहे हे यावरून लक्षात येते, एक पर्यावरण मित्र म्हणून या ठिकाणी महानगरपालिकेने लवकरात लवकर स्वच्छता मोहीम राबवावी व हा गणेश घाट व मंदिराचा परिसर स्वच्छ करावा जेणेकरून पुन्हा प्रदूषण होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *