जळगावात शनिवारी विचारयात्रा रथाचे होणार आगमन..!
जळगांव – चोखंदळ वाचकांना राष्ट्रीय विचारांची मिळणार मेजवानीराष्ट्रीय विचारांच्या पुस्तकांचा समाजात जास्तीत जास्त प्रसार व्हावा, सकारात्मक विचारांची पेरणी व्हावी या सदहेतूने कार्य करणाऱ्या भारतीय विचार साधना फाउंडेशनचे विचारयात्रा रथाचे शनिवारी दिनांक १७.०६.२३ ला सकाळी ९:०० वाजता जळगाव शहरात आगमन होणार आहे. परिणामी चोखंदळ वाचकांना राष्ट्रीय विचारांची मेजवानी मिळणार आहे.पुणे येथील भारतीय विचार साधना फाउंडेशन साहित्य क्षेत्रात कार्य करणारे अग्रगण्य फाउंडेशन आहे. सशक्त भारत व समाज उभारणीसाठी समाजात राष्ट्रीय विचारांची पेरणी करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने फाउंडेशन समाजात राष्ट्रीय विचार घराघरापर्यत पोहचविण्यासाठी ‘संस्कारक्षम साहित्य आपल्या दारी’ या संकल्पनेतून विचारयात्रा रथ तयार केला असून त्यात राष्ट्रीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, कर्तृत्ववान महिला, इतिहास, महापुरुष चरित्रे अशा विविध विषयांची पुस्तके उपलब्ध असणार आहेत. या दुर्मिळ पुस्तकांचा चोखंदळ वाचकांनी लाभ घेण्याचे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
संस्कारक्षम साहित्य आपल्या दारी पुणे येथील भारतीय विचार साधना फाऊंडेशनने राष्ट्रीय विचार घराघरात पोहचविण्यासाठी विचारयात्रा रथाची (पुस्तक विक्री गाडी) निर्मिती केली आहे.या रथामध्ये १५० पेक्षा अधिक पुस्तके प्रदर्शित व १५०० पेक्षा अधिक पुस्तकें असतील. हा रथ शनिवार आणि रविवार दि. १७.०६.२३ व १८.०६.२३ असे दोन दिवस शहरात असणार आहे. शनिवारी सकाळी ९:०० वा. एम्. जे. कॉलेज चौक आवारात, संध्या. ६:०० वा. काव्यरत्नावली चौक परिसरात. रविवारी सकाळी ९:०० वा. नविन बस स्टॅंड परिसर, संध्या. ५:३० वा. शिव कॉलोनी स्टॉप व संध्या. ७:०० वा. पिंप्राळा चौक येथे शहरातील मान्यवर यांच्या हस्ते पाच सत्रात उदघाटन होणार आहे.
१७.०६.२०२३सकाळी – ९:०० वा.एम्. जे. कॉलेज परिसरसंध्या – ६:०० वा.काव्यरत्नावली चौक
१८.०६.२०२३सकाळी – ९:०० वा. नविन बस स्टॅंडसंध्या – ५:३० वा. शिव कॉलोनी स्टॉपसंध्या – ७:०० वा. गुजराल पेट्रोल पंप, पिंप्राळा चौक जळगाव.