जळगांव जिल्हा

जळगाव – एरंडोल धरणगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत महिला वर्गातील दोन जागा बिनविरोध

धरणगाव – सर्व पक्षीय पॅनलच्या माध्यमातून माघारीच्या शेवटच्या दिवशी महिला संवर्गातील दोन जागांसाठी दोनच अर्ज प्राप्त झाल्याने सौ. सोनल संजय पवार व सौ. प्रतिभा दिनेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सर्वपक्षीय पॅनलचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील, आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अमोल पाटील, भारतीय जनता पार्टीचे सुभाष अण्णा पाटील, पीसी आबा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्ञानेश्वर महाजन, ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रवी अण्णा चौधरी, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, रवींद्र जाधव, अमीत दादा पाटील, डॉक्टर सुरेश दादा पाटिल, दिपक वाणी यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलची स्थापना झालेली आहे. उर्वरित १३ जागेसाठी सर्वपक्षीय पॅनलचे उमेदवार ठरलेले असून दिनांक २१ मे रोजी निवडणुक पार पडणार आहे.

बिनविरोध निवडणून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन जळगाव जिल्ह्यातून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *