जळगांव जिल्हा

जळगाव – कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त चोपड्यात मोफत डोळ्यांचे महाशिबिर व बीआरएसचा महामेळावा

लोकनायक न्युज प्रतिनिधी – लतीश जैन

चोपडा – तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा राष्ट्रिय अध्यक्ष ना. के. चंद्रशेखर राव यांच्या प्रेरणेने चोपडा तालुका आदिवासी कोळी समाजाचे नेते, मार्केट कमेटीचे माजी संचालक व बीआरएसचे सन्माननिय सदस्य जगन्नाथ टि. बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२७ जुलै २०२३ (वार- गुरुवार) रोजी स. १० वा. नगरपरिषद नाट्यगृह येथे संपूर्ण मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया (डोळ्यांचे) महाशिबिर घेण्यात येणार आहे.

यासाठी नंदुरबार येथील कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालयाचे सहकार्य लाभणार आहे. त्याचदिवशी स.१० वा. बीआरएसची सदस्य नोंदणी व दुपारी २ वाजता बीआरएसचा पक्षप्रवेश सोहळा व महामेळावा न. प. नाट्यगृह चोपडा येथे घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला तेलंगणाचे अर्थमंत्री ना.हरीश राव व अन्नमंत्री ना. रवींदरसिंग यांनी शुभेच्छां दिलेल्या आहेत. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बीआरएसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम तर दिपप्रज्वलन वरिष्ठ नेते दशरथ सावंत व दिपप्रज्वलन उत्तर महाराष्ट्र नाशिक विभाग प्रमुख नानासाहेब बच्छाव यांच्या शुभहस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून बीआरएसचे राष्ट्रिय महासचिव हिमुश तिवारी ,राज्य समन्वयक व माजी मंत्री हरिभाऊ राठोड, पुणे विभाग समन्वयक बाळासाहेब देशमुख, धुळे नंदुरबार जिल्हा समन्वयक एडवोकेट अविनाश पाटील, जळगाव जिल्हा समन्वयक देवेंद्र वराडे, धुळे उपजिल्हासमन्वयक विठ्ठल पाटिल, अमळनेर समन्वयक शिवाजीराव पाटिल, शिरपूरचे बीआरएस सदस्य ओंकारराव जाधव, विठ्ठलराव नगराळे, नारायण पवार यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रार्थनागायन जय गुरुदेव संगतचे खंडू महाराज (कोळंबा) व सूत्रसंचलन सामा. कार्यकर्ते सागरकुमार कोळी (अमळनेर) हे करणार आहेत. बीआरएस पक्षाचे संपर्क कार्यालय श्री.एकविरा क्रुषी सेवा केंद्राच्या जवळ, बापूजी कॉम्प्लेक्स (यावल रोड) चोपडा येथे सुरू केलेले आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चोपडा बीआरएसचे पदाधिकारी समाधान बाविस्कर, दीपक पाटील, कोमल पाटील, मनोज पाटील, अनिल कोळी, वर्षा चौधरी, पमाताई पानपाटील, आशाबाई सोनार, शिला पाटील, शांताराम बारेला हे विशेष प्रयत्न करीत आहेत. तालुका व जिल्हाभरातील गरजू रुग्णांनी डोळ्यांच्या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच बीआरएस पक्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीआरएसचे सदस्य जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *