जळगाव ग्रामीणचा सर्वांगिण विकास हाच गुलाबराव देवकरांचा ध्यास
भादली-कडगाव-शेळगाव परिसरात प्रचार रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत
जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या भादली-कडगाव-शेळगाव परिसरातील प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले. याप्रसंगी त्यांनी ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. जळगाव ग्रामीणच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही सुद्धा दिली.
गुलाबराव देवकर यांनी भादली, शेळगाव, कडगाव, सुजदे, देऊळवाडे, भोलाणे, कानसवाडे आदी गावांना प्रचार रॅलीच्या माध्यमातून भेटी दिल्या. महिला, शेतकरी व बेरोजगारांच्या कल्याणासाठी महाविकास आघाडीने सादर केलेल्या जाहीरनाम्यातील पंचसूत्रीची माहिती दिली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, संचालक दिलीप पाटील, योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, डॉ.अरूण पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, पं.स.चे माजी उपसभापती विजय नारखेडे, भादलीचे सरपंच मनोज चौधरी, शेळगावचे माजी सरपंच हरीष कोळी, रामा कोळी, निवृत्ती कोळी, कानसवाडे येथील सरपंच संजय कोळी, माजी उपसरंपच सुकदेव कोळी, भोलाणेचे सरपंच नितीन सपकाळे, कडगाव येथील मुरलीधर कोळी, पंढरीनाथ कोळी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेळगाव बॅरेजचे पाणी शेतीशिवारात खेळविणार
जळगावहून शेळगावमार्गे यावल जाण्यासाठी दोन्ही बाजुने राज्यमार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र, तापी नदीच्या पात्रात शेळगाव बॅरेजच्या खाली दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम खूपच संथगतीने सुरू आहे. सेवेची संधी मिळाल्यानंतर सदर पुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल. तसेच शेळगाव बॅरेजचे पाणी जळगाव तालुक्यातील शेतीशिवारात खेळविण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले जातील. जेणेकरून कोरडवाहू शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली येऊन त्यांचे जीवनमान सुधारेल, असे प्रतिपादन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले