जळगांव जिल्हाताज्या बातम्याधरणगाव ग्रामीणधरणगाव शहर

जळगाव : धरणगाव येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमापासून वंचित घटक व उपेक्षित वर्ग वंचितच ! एकलव्य संघटनेचा आरोप

धरणगांव – येथे दिनांक १६ / ०६ / २०२३ रोजी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम जळगांव जिल्हा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.गुलाबरावजी पाटील, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थितीत आयोजित केला होता. या कार्यक्रमापासुन वंचित घटक व दुर्लक्षित वर्ग वंचितच राहिला असल्याचा आरोप एकलव्य संघटनेने केला आहे. या संबंधीचे निवेदन संघटनेच्या वतीने धरणगाव तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय जुलाल पवार, वराड बु. यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्यानुसार, प्रशासनाने जि.एस.लोन्स येथे शासना आपल्या दारी या घेतलेल्या कार्यक्रमात वंचित घटक व उपेक्षित वर्ग यांच्या पर्यंत शासनाच्या योजना पोहचल्या पाहीजे असे असतांना वराड बु. ग्राम पंचायतीचे सरपंच, सदस्य अन्य पदाधिकारी यांना या कार्यक्रमाची कोणतीही माहिती अथवा सूचना देण्यात आली नाही. वंचित घटकांना, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असे कार्यक्रम घेण्यात येत असतात. मात्र अजूनही त्यांचे भरपुर प्रश्न प्रलंबित आहेत. ते आपल्याच ग्रामपंचायत कार्यालयात येण्यास घाबरतात, ते तहसील, पंचायत समिती मध्ये काय जाणार, त्यांचा उदरनिर्वाहाचा, पोटाची खळगी भरण्याची गरज असल्याने ते सर्व योजनेतून वगळलेले असतात. तरी देखील शासन यांच्या पर्यंत कसें पोहोचणार ? हा मोठा प्रश्न असल्याचे संजय पवार यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे संजय पवार हे स्वतः वराड बु.ग्रामपंचायतीचे सदस्य असून, धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती आहेत.  

एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवनराजे सोनवणे, संस्थापक कार्याध्यक्ष सुधाकर वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती, ग्रामपंचायत सदस्य संजय जुलाल पवार, जेष्ठ कार्यकर्ते व सल्लागार भगवान दादा सोनवणे व ईतर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सदरचे निवेदन दिनांक १६ / ०६ / २०२३ रोजी धरणगावचे नवनियुक्त तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *