ताज्या बातम्या
जळगाव : नऊ दिवसांपुर्वी झालेल्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू
प्रतिनिधी आमीन पिंजारी कजगाव तालुका भडगाव
जळगांव – कजगाव तालुका भडगाव येथील अमोल रामदास साठे हा बावीस वर्षीय तरुण मोटरसायकलने कामानिमित्त जात असताना भडगाव जवळ भीषण अपघात झाला होता, जखमी झालेल्या तरुणाला पाचोरा येथे दवाखान्यात दाखल केले होते मात्र त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथे गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते, तब्बल नऊ दिवस डॉक्टरनी तरुणाला वाचवण्याचा साठी अहोरात्र प्रयत्न केले , मात्र नीतीला ते मान्य नव्हते अखेर शुक्रवारी दुपारी या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मयत अमोल साठे यांच्या पक्षात आई-वडील दोन भाऊ आजी काका काकू असा परिवार आहे.