जळगाव | बोंडार हवेली गावात घडलेल्या घटनेचा निषेध करत धरणगांव पोलिसांना देण्यात आले निवेदन
धरणगाव – मागासवर्गीय समाजावर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध व्यक्त करीत गुन्हेगारांवर भारतीय दंड संहितेप्रमाणे गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत धरणगाव येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन पोलिसांना देण्यात आले. निवेदनात म्हटल्यानुसार१) नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथे १४ एप्रिल ची मिरवणूक गावातुन काढली म्हणुन अक्षय भालेराव यांची निर्घुण हत्या करण्यात आली तरी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहीजे.२) लातुर जवळ रेणापूर येथे तीन हजार व्याज न दिल्यामुळे गुंड सावकाराने मातंग समाजातील गिरीधरी तपकाले ची हत्या करण्यात आली व परिवाराला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आले. तरी तपकाले परिवाराला शासनाने आर्थिक मदत करावी व आरोपींना तात्काळ अटक व्हावी व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी. या दोन मागणींचे निवेदन मागसवर्गीय सेनेतर्फे धरणगाव येथील मा. तहसिलदार साहेब व मा.पोलिस निरीक्षक साहेब यांना देण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणून प्रथमच गावातून काढल्याने काहि जातीयवाद्यांनी अक्षय भालेराव यांची हत्या केली, व बौद्ध समाजाच्या वस्तीत महीला व पुरुष यांच्यावर दगडफेक केली. तसेच लातुर रेणापुर येथे मातंग समाजाचे गिरीधरी तपघाले यांची देखील सावकाराला तीन हजार व्याज न दिल्यामुळे सावकाराने हात पाय बांधुन डोळ्यात मिरची टाकुन हत्या करण्यात केली व परिवाराला देखील मारहाण केली. ह्या घटना खुप निंदनीय व खेदकजनक आहेत याचा मागासवर्गीय सेना तीव्र जाहीर निषेध करीत आहे. अक्षय भालेराव व गिरीधरी तपघाले यांना न्याय देण्यासाठी सीबीआय मार्फत उच्च स्तरीय चौकशी व्हावी व दोन्ही पिडीत कुटुंबांना शासनातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून ५० लाख रुपये मदत करावी व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अन्यथा मागासवर्गीय सेनेमार्फत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मा.मुकुंदराव नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाने निवेदण देण्यासाठी मागासवर्गीय सेनेचे उप जिल्हाप्रमुख मा. ज्ञानेश्वर भालेराव (नानाभाऊ), मागासवर्गीय सेनेचे जिल्हाकार्य कारणी सदस्य मा. प्रशांत भाऊ शिंदे , मा.सेनेचे ता प्रमुख मोहनजी शिंदे, मा.सेनेचे उप.ता.प्रमुख मा.अमोल भाऊ गजरे, मा.सेनेचे उप.ता.प्रमुख मा.आशिष सपकाळे, मा.सेनेचे सदस्य प्रेमराज भालेराव, शुभम शिंदे, सचिन कोळी, किशोर शिंदे, सिराज कुरेशी, जितेंद्र मराठे, अजय मैराळे अदि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.