जालना : सौंदर्य साधना प्रशिक्षण कार्यशाळेचे जालना येथे आयोजन
जालना : सौंदर्य साधना प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
सौंदर्य विषयी जागरूक असणाऱ्या युवक-युवती व महिला ब्युटिशियन यांच्यासाठी जालना येथे दोन दिवशीय सौंदर्यास साधना प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आले असून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने याबाबत अधिक माहिती असे कि नेहरू युवा केंद्र भारत सरकार पुरस्कार प्राप्त धरतीधन ग्रामविकास संस्था व इंदिरा इंडस्ट्रिस यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१० ते ११ जून रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत हॉटेल फ्लोरा इन, औरंगाबाद रोड, जालना येथे दोन दिवसीय सौंदर्य साधना प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सौंदर्यशाश्त्रात डॉक्टरेट मिळविणाऱ्या डॉ.जयश्री घाटे या मार्गदर्शन करणार आहे. यापूर्वी त्यांनी आंतराष्ट्रीय स्तरावर विदेशात ब्युटिशियन्स ना अमूल्य मार्गदर्शन केलेले असून एच.डी, ३-डी मेकअप यासह स्पेशल हायड्रा ट्रीटमेंट या अत्याधुनिक साधनांद्वारे सौंदर्य जपणुकी बाबत मार्गदर्शन करणार आहे. तरी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रत्ना मॅडम मो.७३८५४८५४९६, ९६३७८७५५५३ या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी असे आवाहन धरतीधन ग्रामविकास संस्थेच्या सचिव श्रीमती. कविता सदावर्ते यांनी केले आहे.