जिल्हयात बोगस किटकनाशके विक्री करणाऱ्यावर कारवाई करा

जळगाव : गुजरात राज्यातुन मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्हयात किटकनाशक, बुरशीनाशक, अळीनाशक, तणनाशक इत्यादी औषधी बाजारात विकली जात आहे. बाजारात सद्यस्थितीतील औषधे ही बनावट नावाने विकली जात आहेत किंवा त्या औषधामधील घटकाचा वापर करून बनवल्या जात आहे. अश्या पध्दतीने औषधींचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या किटकनाशकात मोठ्या प्रमाणात विषारी घटकाचा वापर करण्यात येत असतो जेणे करून पिंकावर चांगल्या प्रकारचा परिणाम (रिझल्ट) येण्यासाठी परंतु माती सह मानवी आरोग्यावर याचा मोठा धोका निर्माण होत आहे व त्याचे दुष्परिणाम आपल्याला वेगवेगळया आजारातून पाहायला मिळत आहे. आपणास विनंती आहे की आपण याकडे लक्ष देऊन बनावट किटकनाशके विक्री करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जळगाव जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील, तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील तालुका संघटक विलास सोनार, तालुका सचिव मनोज लोहार, शहर सचिव हर्षल वाणी, संदिप मांडोळे आदि उपस्थित होते.