जिल्ह्यातील मौलाना आजाद अल्पसंख्यांक महामंडळातील प्रलंबित अर्ज निकाली काढणे व नवीन अर्जाची मागणीसाठी लातूर जिल्हा शिवसेना अल्पसंख्यांकच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन

बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळात दाखल केलेले प्रलंबित अर्ज निकाली काढणे व नवीन अर्जाची प्रक्रिया चालू करण्यात यावे या मागणीचे निवेदन लातूर जिल्हा शिवसेना अल्पसंख्यांकच्या वतीने जिल्हाधिकार्यांना दि.२४ जुन.२०२४ सोमवारी लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना देण्यात आले.यावेळी लातूर शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख आसिफ किनिवाले,मौलाखाँ पठाण,मकसुद शेख पदाधिकारी उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाकडून मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाकडे लातूर जिल्ह्यातून एकूण २८० अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मयातील जवळपास ८२ अर्ज निकाली काढले आहेत, उर्वरित राहिलेले अर्ज लवकरात लवकर निकाली काढून अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळण्यासाठी व नवीन अर्जाची प्रक्रिया चालू करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.यावेळी अल्पसंख्यांक समाजाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
