जि.प.प्रा.शाळा.तुंगी बु. येथे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह उत्साहात साजरा

लातुर : विद्यार्थ्यांच्या सांस्कृतीक कार्यक्रमाला ग्रामस्थांची पसंती

न्युज लोकनायक साठी जीवन जाधव लातुर
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंगी (बु )येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांची कवायत, डंबेल्स लेझीम . इत्यादी खेळ घेण्यात आले. शाळेतील शालेय समिती व शिक्षकांच्या सुसज्य नियोजनातुन सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला . सास्क्रतीक कार्यक्रमात जवळपास 22 गीते घेण्यात आली. यामध्ये देशभक्ती गीत,लोकगीते ,सह लेझीम डान्स सादर करण्यात आले. या निमित्ताने प्राथमीक शाळा.तुंगी बुद्रुग.या शाळेत शिकून सध्या अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत असलेले तुंगी गावचे सुपुञ सचिन महादेव कलाने यांचा उपसरपंच श्री बाजीराव जाधव यांच्या हस्ते व त्यांचे वडिल महादेव कलाने यांचा तुंगी खुर्द.चे उपसरपंच सतीश सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला*शाळेतील विद्यार्थ्यांना सचिन कलाने यांनी २५५१ रू.बक्षीस देऊन प्रोत्साहन दिले.या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष जाधव, उपाध्यक्ष .सुनिल पवार, सदस्य , सुरेश सुर्यवंशी, मनीषा चव्हाण सरपंच मोहन कावळे, उपसरपंच .बाजीराव जाधव ग्रामसेवक पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमातील गीतांना व गाण्यांना प्रेक्षकांनी भरघोस बक्षिसे दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक चव्हाण .यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक कुलकर्णी सर, स्वामी सर , कबाडे सर, धनेगावे सर,झिंगाडे सर, कांबळे मॅडम , घोडके मॅडम,मोटाडे मॅडम,फुलवरे मॅडम , जाधव मॅडम ,जाधव सर, सोनटक्के सर परीश्रम घेतले. व शाळा,शाळा व्यवस्थापण समिती ग्रामपंचायत व तुंगी ग्रामस्थ यावेळी उपस्थीत होते.