झरी ते करवली रस्त्या साठी आत्मदहनाचा इशारा मागे

परभणी लोकनायक न्यूज / राहुल धबाले

झरी ते करवली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, त्यामुळे काही दिवसांतच रस्त्यावरील पुलाला तडे गेले व रस्त्यावर मुरूम व सोलिंग कमी प्रमाणात टाकण्यात येत आहे. अशी तक्रारअर्ज दि.२७/०६/२४ रोजी संबंधित रस्त्यावरील शेतकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे केली होता.झरी ते करवली रास्ता गेल्या कित्येक वर्षे मंजूर झाला नव्हता रस्त्यावरील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी तारावरची कसरत करावी लागत होती मात्र जिल्हा परिषद फंडातून या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असून रस्त्यावरील शेतकऱ्यांची या रस्त्याचे काम उत्कृष्ट व दर्जेदार व्हावे, अशी आशा होती. मात्र सुरू असलेले रस्त्याचे काम व्यवस्थित होत नसून मुरूम, सोलिंग योग्य प्रमाणात टाकण्यात आले नाही कामाचा योग्य दर्जा राखला जात नसल्याने उत्तम कामाजी जगाडे यांनी प्रजास् ताक दिनी निवेदना द्वारे प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता. व याची सर्वस्व जबाबदारी सदरील गुत्तेदार, इंजिनियर व शासनाची राहील असे स्मरण पत्र जिल्हाधिकार्यालय परभणी, पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी, व जिल्हा परिषद कार्यालय परभणी यांना उत्तम जगाडे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले होते. मात्र या निवेदनाची दखल घेत आज जिल्हा परिषदेच्या वतीने डी. जी. सोनकांबळे यांना पाठवून उत्तम जगाडे यांची भेट घेण्यास सांगितले यावेळी संबंधितांनी चर्चा केली व जिल्हा परिषदेच्या वतीने पत्र देण्यात आले. व रस्त्याची कामे व्यवस्थित पणे करण्यात येईल असे आश्वासन देऊन उत्तम जगाडे यांना आत्मदानाचा इशारा मागे घेण्यास जिल्हा परिषद च्या वतीने विनंती करण्यात आली या विनंतीला मान देऊन उत्तम जगाडे यांनी आत्मदहनाचा इशारा मागे घेतला.