ताज्या बातम्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभिवादन

जळगांव : आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सकाळी ८: वाजता अभिवादन व मानवंदना जळगाव रेल्वे स्टेशन जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला देण्यात आली. कविवर्य वामन दादा कर्डक यांचे “उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे” हे गीत सर्वांनी मिळून गायले.
या प्रसंगी अभिवादन करण्यासाठी रा. स्व. संघाचे प्रांत सहकार्यवाह श्री स्वानंद झारे, विभाग कार्यवाह श्री स्वप्निल चौधरी, विभाग प्रचारक विकास देशपांडे, शहर कार्यवाह श्री विजय ठाकरे, धर्मजागर गतिविधिचे श्री भाईजी मुंदडा, समरसता मंच चे श्री विजय मोघे व शहरातील अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.