ताज्या बातम्या

तापी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी “झोपा काढो” आंदोलनाचा इशारा…

प्रतिनिधी – विनायक पाटील

चोपडा – सन २००८ मध्ये गूळ मध्यम प्रकल्पाचा उजवा व डावा कालव्यासाठी वर्डी, बोरखेडा, खरद, नारद, अंबाडे, आडगाव, विरवाडे, वडती, विष्णापूर व चोपडा या गावांच्या शिवारातून संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनी चा मोबदला आज १६ वर्ष पूर्ण झाले तरीही प्रशासनाने जमिनीचा मोबदला दिलेला नाही या झोपलेला प्रशासनाला जाग यावी म्हणून २२ नोव्हेंबर पासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकारी संचालक तापी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयातच झोपा काढो आंदोलन करतील असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील यांनी दिला आहे. गूळ मध्यम प्रकल्पाचा उजवा व डावा कालव्यासाठी संपादित केलेल्या शेतजमीनीचा मोबदला मिळावा यासाठी गेल्या १६ वर्षापासून प्रकल्पग्रस्त शेतकरी तापी पाटबंधारे महामंडळ कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत वेळोवेळी निवेदन देऊन पण दखल घेतली जात नाही. २१ नोव्हेंबर पर्यंत संपादित केलेल्या शेत जमिनीच्या मोबदला न मिळाल्यास २२ नोव्हेंबर पासून कार्यकारी संचालक तापी महामंडळ च्या कार्यालयात प्रकल्पग्रस्त शेतकरी “जमिनीवर झोपून” आंदोलन करतील व जोपर्यंत जमिनीचा मोबदला मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी तापी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयातुन जाणार नाहीत असं निवेदन शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील उपजिल्हाध्यक्ष किरण गुजर, विनोद धनगर, सचिन शिंपी, सय्यद देशमुख, रवींद्र माळी, प्रेमचंद धनगर, अखिलेश पाटील, खुशाल सोनवणे, नामदेव महाजन, कविता पाटील, जयश्री देशमुख, धनंजय धनगर आदी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *